Nawazuddin Siddiquis Mother files FIR: बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्धीकीच्या (Nawazuddin Siddiqui) कुटुंबातील गृहकलह समोर आला आहे. नवाजुद्दीनची आई मेहरुनिसा सिद्धिकी (Mehrunisa Siddiqui) यांनी आपली सून आलियाविरोधात (Aaliya​) पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मुंबईतील वर्सोवा पोलीस ठाण्यात (Versova Police Station) ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. वर्सोवा पोलिसांनी आलियाला चौकशीसाठी बोलावलं आहे. पोलिसांनी कलम 452, 323, 504, 506 of IPC अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, आलियाचं आपल्या सासू मेहरुनिसा यांच्याशी भांडण झालं आहे. नवाजुद्दीनच्या कुटुंबात सध्या संपत्तीवरुन वाद सुरु आहे. हा वाद नवाजुद्दीन, त्याची आई आणि पत्नीमध्ये आहे.


आलियाने मे 2020 मध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला होता. इतकंच नाही तर तिने नवाजुद्दीनवर गंभीर आरोप केले होते. 


जुलै 2020 मध्ये आलियाने मुंबईमधील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यानंतर तिने जबाब नोंदवण्यासाठी मुंबईहून मुझफ्फरनगर गाठलं होतं. आलियाने नवाजुद्दीन आणि त्याच्या कुटुंबातील चार सदस्यांविरोधात आपला जबाब नोंदवत त्यांच्यावर घऱगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. 


काही महिन्यांनी आलियाने नवाजुद्दीनसह असणाऱ्या आपल्या नात्याला आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला. करोनाची लागण झाल्यानंतर नवाजुद्दीन आपली आणि आपल्या मुलांची कशाप्रकारे काळजी घेत होता याबद्दल तिने सांगितलं होतं.