मुंबई : बॉलिवूडमध्ये काही कलाकारांचा संघर्ष हा इतरांसाठी प्रेरणास्त्रोत ठरत असतो. संघर्षाच्या काळात यशाची पहाट कशी असेल याबाबत स्वप्न पाहण्यासाठीही मोठी किंमत मोजणाऱ्या या कलाकारांना पुढे जाऊन असं काही यश मिळतं की इतरांना त्यांच्या नशीबाचा हेवाच वाटतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेता पंकज त्रिपाठी (pankaj tripathi ) त्यापैकीच एक. राष्ट्रीय पुरस्कारांवरही मोहोर उमटवणाऱ्या पंकज त्रिपाठी यांनी चित्रपट, वेब सीरिज विश्वात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. हल्लीच प्रदर्शित झालेल्या 'मिमी' या चित्रपटातून त्यांनी वडिलांची भूमिका साकारली आणि पुन्हा एकदा रुपेरी पडदा गाजवला. पंकज त्रिपाठी आज यशाच्या शिखरावर असले तरीही त्यांनाही संघर्ष चुकलेला नाही. 


जीवनातील गतकाळाला ते आजही विसरलेले  नाहीत. किंबहुना आपल्याला या काळात पत्नीची मोठी साथ मिळाली, असंही ते आवर्जून सांगतात. याचसंदर्भात सांगताना एका मुलाखतीत त्यांनी म्हटलं, 'खरं सांगावं तर, 2004 पासून 2010 पर्यंत मी काहीच कमवत नव्हतो. घराचा संपूर्ण भार पत्नीवर होता. मी तर अंधेरीमध्ये स्क्रीप्ट घेऊन कोणी काम देतं का, अभिनयाची संधी देतं का असंच विचारत फिरत होतो. तेव्हा माझा आवाज कोणीच ऐकला नाही. आता मात्र पार्किंगमध्येच माझ्यासाठी चित्रपट वाट पाहत असतो. पार्किंमध्ये दिग्दर्शक येऊन मला विचारतो, तुम्ही कुठे आहात, फिल्म करायचीये मला तुमच्यासोबत. आता तर पार्किंगमध्ये रांगच लागलेली असते.'


छोटा कपड्यात जेव्हा नीना गुप्ता गुलजार यांना भेटल्या....यावर त्यांनी दिला 30 वर्षांपूर्वीचा हा दाखला


 


जीवनाच्या एका टप्प्यावर आव्हानांचा डोंगर समोर उभा ठाकलेला असताना त्यारपुढं आत्मविश्वास खचू न देणं पंकज त्रिपाठी यांना उत्तम जमलं. याच आत्मविश्वासाच्या बळावर त्यांनी बॉलिवूडमध्ये भल्याभल्या सुपरस्टारनाही मागे टाकलं. प्रेक्षकांकडून त्यांना मिळणारा प्रतिसादच हे सारंकाही सांगून जातो.