मुंबई : विमानानं प्रवास करतेवेळी हा अनुभव प्रत्येकालाच आनंद देणारा असतो. अनेकदा प्रत्येक प्रवास खूप काही शिकवून आणि दाखवून जातो. सध्या बॉलिवूडमधील एका अभिनेत्याला मात्र विमान प्रवासाची एक वेगळी आणि तितकीच विचित्र प्रचिती आली. कारण, तिथं त्याचा वाद झाला आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॉकपीटमध्ये जाऊन वैमानिकाशीच वाद घालणारा हा अभिनेता आहे, राज बब्बर यांचा मुलगा, आर्य बब्बर. 


आर्यनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ पोस्ट करत त्यासोबत उपरोधिक कॅप्शन लिहिलं. त्यानं केलेली कृती वैमानिकाला खटकली, ज्याचा जाब त्यानं आर्यला कॉकपीटमध्ये बोलवून विचारला. 


पण, आपण मात्र आपल्या मित्राशी विनोद करत असल्याच्या म्हणण्यावर आर्य ठाम दिसला. 


तुम्ही आमची खिल्ली उडवली का, असा प्रश्न वैमानिकानं करताच आर्यनं त्याला नकार दिला. ये जहाज चलाएगा?, असं आपण ऐकल्याचं वैमानिकानं आर्यला सांगितलं जे त्यानं स्पष्टपणे नाकारलं. 


जिथं वैमानिक या हमरीतमुरीमध्ये माघार घेताना दिसला, तिथं आर्य मात्र चांगलाच संतापलेला दिसला. आपल्या पदाचा आणि त्यामुळं मिळालेल्या ताकदीचा तुम्ही यासाठी वापर करता का, असं म्हणत त्यानं वैमानिकाला प्रतिप्रश्न केला आणि तीव्र सूरात नाराजी व्यक्त केली. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Mr. Babbar (@aaryababbar222)


सध्या आर्य आणि वैमानिकामध्ये झालेला हा वाद चर्चेचा विषय ठरत आहे.