Ranbir Kapoor on Uorfi Javed: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या 'तू झुठी मै मक्कार' (Tu Jhooti Main Makkar) चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office) चांगली कामगिरी करत आहे. यादरम्यान रणबीर कपूरने बहिण करीना कपूरच्या टॉक शोमध्ये (Kareena Kapoor Talk Show) हजेरी लावली. यावेळी रणबीरने अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. तसंच आपल्या खासगी आयुष्याशी संबंधित अनेक खुलासे केले. दरम्यान यावेळी करिनाने उर्फी जावेदचा (Uorfi Javed) फोटो दाखवला असता, रणबीरने आपल्या तिची फॅशन आवडत नसल्याचं स्पष्ट सांगितलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टॉक शो दरम्यान एका सेगमेंटमध्ये करिनाने काही सेलिब्रिटींचे फोटो रणबीरला दाखवले. मात्र या सेलिब्रिटींचे चेहरे लपवण्यात आले होते. रणबीरला कपड्यांच्या आधारे या सेलिब्रिटींना ओळखायचं होतं आणि त्यांना 'बॅड टेस्ट' की 'गुड टेस्ट' असं रेटिंग करायचं होतं. 


करीनाने यावेळी उर्फी जावेदचा फोटो दाखवला. रणबीरनेही लगेच हा उर्फी जावेदचा फोटो असल्याचं ओळखलं. फोटो पाहताच तो म्हणाला की "ही उर्फी आहे का?". यानंतर तिच्या स्टाइलवर कमेंट करत त्याने म्हटलं की "मी अशा प्रकारच्या फॅशनचा फार मोठा चाहता नाही. पण आपण सध्या अशा जगात राहत आहोत जिथे तुम्ही ज्या कपड्यांमध्ये कंफर्टेबल आहात...". दरम्यान रणबीर बोलत असताना करिना त्याला थांबवते आणि 'बॅड टेस्ट' की 'गुड टेस्ट' असं विचारते. त्यावर रणबीर कपूर म्हणतो की, ही वाईट टेस्ट आहे. 



प्रियांका चोप्राचं कौतुक


दरम्यान करीनाने रणबीरला प्रियांका चोप्राचा फोटो दाखवला असता त्याने कौतुक केलं. प्रियांकाला सुंदर म्हणत त्याने तिच्या फॅशन टेस्टचं कौतुक केलं. "मला वाटतं ती फार चांगले कपडे घालते. तिच्याकडे चांगला आत्मविश्वास आहे. तुमच्याकडे जर आत्मविश्वास असेल तर तुम्ही काहीही करु शकता," असं त्याने म्हटलं. 


स्टार किड असल्याने त्रास


यावेळी रणबीर कपूरने आपण स्टार किड असल्याने त्रास दिला जायचा असा खुलासाही केली. त्याने सांगितलं की "एका अभिनेत्याचा मुलगा असल्याने अनेकदा तुमचे सिनिअर तुम्हाला धमकावतात. पण मला वाटतं या गोष्टी तुम्हाला कठोर बनवतात. जगासाठी त्या तुम्हाला तयार करतात. मला वाटतं हा फक्त एक आशीर्वाद होता. मी त्याकडे अरेच्चा मला धमकावलं होतं असा विचार करत घाबरत नाही. पण एक अभिनेत्याचा मुलगा असल्याने शाळेत मला धमकावण्यात आलं होतं हे खरं आहे".