मुंबई : बॉलिवूड प्रेमींकडे सध्या चर्चा करण्याजोगे अनेक विषय आहेत. यामधीलच एक महत्त्वाचा विषय म्हणजे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचं लग्न. (RANBIR KAPOOR ALIA BHATT)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जवळपास दोन वर्षांपूर्वी आलिया आणि रणबीरनं त्यांच्या नात्याबाबत खुलासा केला आणि सर्वांनाच धक्का दिला. 


आलिया आणि रणबीर ही जोडी त्या क्षणापासून चाहत्यांच्या विशेष आवडीची ठरली. पाहता पाहता आता हे सेलिब्रिटी कपल लग्नाच्या बेडीत अडकण्यासाठी सज्ज झाली आहे. 


लग्नाच्या घाईगडबडीमध्येच आता चाहत्यांचा एक वर्गही तयार झाला आहे, जो आलियाला रणबीरशी लग्न न करण्याचा सल्ला देत आहे. 


मुक्काबाज फेम अभिनेता Vineet Kumar Singh लग्नबंधनात अडकला


आलियाला मिळणारा हा सल्ला पाहता, यामागे एक व्हायरल होणारा व्हिडीओ कारणीभूत ठरत आहे. 


व्हिडीओ दिवाळीदरम्यानचा असून, आलिया आणि रणबीरनं दुर्गापूजेसाठी हजेरी लावली होती ते क्षण यामध्ये कैद झाले. 


दिवाळी आणि दुर्गापूजेचं निमित्तं साधत यावेळी आलियानं निळ्या रंगाचा लेहंगा घातला होता. त्याचवेळी आलिया पुढे गेल्यानंतर तिचा पायघोळ लेहंगा रणबीर पायानं उडवत पुढे ढकलताना दिसला. 


रणबीरची ही कृती चाहत्यांना काही पटली नाही. ज्यामुळे त्यांनी त्याची शाळाच घेतली. काहींनी तर आलियाला सल्ला देत याच्याशी लग्न करु नकोस असं सांगितलं. 



आलियाला मिळणारा हा सल्ला आणि रणबीरची होणारी कानउघडणी पाहता या जोडीप्रती चाहत्यांच्या मनात असणारा आपलेपणा अगदीच स्पष्टपणे दिसत आहे.