Ranbir Kapoor : कारकिर्दीत अपयशाचा सामना केल्यानंतर आता अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) पुन्हा एकदा त्याच्या वाट्याला आलेलं यश अनुभवताना दिसत आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) या चित्रपटातून रणबीर प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा चित्रपट आणखी एका कारणासाठी चर्चेत आहे, ते म्हणजे आलिया आणि रणबीरची ऑनस्क्रीन केमिस्ट्री. लग्नानंतर पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसलेली ही जोडी सध्या बऱ्याच कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसत आहे. पण, त्यातच आता एक भलतंच प्रकरण कानी पडू लागलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

म्हणे रणबीरनं एका अभिनेत्रीसाठी घर सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या या निर्णयाने कुटुंबीयांनाही धक्काच बसला. सर्वकाही सुरळीत सुरु असताना तो हा निर्णय का घेईल? या विचारानं आलियाही हैराण होईल. रणबीरनं खरंच घर सोडण्याचा निर्णय घेतला का? तर, हो.... पण आता नाही. काही वर्षांपूर्वी तो या वळणावरून पुढे गेला. 


रणबीर अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) सोबत रिलेशनशिपमध्ये असतानाच त्यानं तिच्यासोबत लिवइनमध्ये राहण्याचं ठरवलं होतं. इतकंच काय, तर तेव्हा त्यानं आई- वडील (Rishi Kapoor - Neetu Kapoor) यांचं राहतं घरही सोडलं होतं. रणबीरच्या वडिलांसाठी हा एक मोठा धक्का होता. त्याची आईसुद्धा काहीशी बिथरली होती असंही म्हटलं गेलं. (Bollywood Actor Ranbir Kapoor once left parents home for katrina kaif)


वाचा : 'त्या' तीन सेकंदांनी बदललं ऐश्वर्या रायचं आयुष्य, एकदा तुम्हीही पाहा कुठे नशीब फळफळलं


पुढे कतरिनासोबतच्या (Katrina kaif) नात्यात दुरावा आल्यानंतर रणबीरनं पुन्हा एकदा आई- वडिलांसोबत राहण्याचा निर्णय घेत तो स्वत:च्या घरी परतला. प्रेमाच्या नात्यात रणबीर त्याच्या कुटुंबापासून दुरावला खरा, पण फार परिपक्वतेनं त्यानं ही सर्व परिस्थिती सावरून नेली. 


अभिनेत्री आलिया भट्ट (Alia bhatt) हिच्यासोबत काही महिन्यांपूर्वी लग्नबंधात अडकलेला रणबीर सध्या त्याच्या वैवाहिक आयुष्यात छान रमला आहे. इतकंच नव्हे, तर आता तो बाळाच्या आगमनासाठीही आतुर झाला आहे.