मुंबई : दबंग खान सलमानच्या आगामी 'राधे' या सिनेमाच्या सेटवर एक अपघात झाला आहे. या अपघातात अभिनेता रणदीप हुडाला दुखापत झाली आहे. दुखापत झाल्याने रणदिपला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रणदिप एक अॅक्शन सीक्वेन्सचं शूट करत असताना हा अपघात झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता, रणदिपच्या प्रकृतीत सुधारणा झाल्या असून, त्याला रुग्णालयातून घरी पाठवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्याची तब्येत ठीक असल्याचं बोललं जात आहे. रणदिपचा रुग्णालयातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.



'राधे' चित्रपटासाठी सलमान खानने खास कोरियाई स्टंट टीम ठेवल्याची माहिती आहे. ही टीम चित्रपटातील अॅक्शन सीन डिझाइन करणार आहे. या चित्रपटात रणदिप हुडा खलनायकाची भूमिका साकारणार आहे. चित्रपटातील अॅक्शन सीन्समध्ये  रणदिप आणि सलमान आमने-सामने पाहायला मिळणार आहेत.


'राधे' चित्रपटाशिवाय रणदिप हुडा, सारा अली खान आणि कार्तिक आर्यनसोबत इम्तियाज अली यांच्या 'आजकल' चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.