कमी वयातच बॉलिवूड अभिनेत्यावर मोठी शस्त्रक्रीया; शरीरात...
त्याला 1 मार्चला रुग्णालयात दाखल करण्यात आलं
मुंबई : दर्जेदार अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या एका बॉलिवूड अभिनेत्यावर नुकतीच एक मोठी शस्त्रीक्रिया करण्यात आली आहे. सध्या हा अभिनेता कोकिलाबेन धीरुभाई अंबानी या रुग्णालयात उपचार घेत आहे. हा अभिनेता आहे, रणदीप हूड्डा.
फेब्रुवारी महिन्यामध्ये जेव्हा तो 'इंस्पेक्टर अविनाश'च्या सेटवर चित्रीकरण करत होता, त्यावेळी त्याच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली होती.
ज्यानंतर आता त्याला 1 मार्चला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यापूर्वी म्हणजे 2020 मध्येही त्याला एक शस्त्रक्रिया करावी लागली होती.
त्यावेळी मुलाखतीत काय म्हणालेला रणदीप ?
2008 मध्ये जेव्हा आपण पोलो गेम खेळत होतो, त्यावेळी घोडा घसरला आणि आपण उजव्या पायावर पडला होता. ज्यामुळे त्याच्या पायाच्या खालच्या भागाला जबर दुखापत झाली होती.
तेव्हाच आपल्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली, ज्यानंतर पायात प्लेट आणि स्क्रू लावण्यात आला होता, शस्त्रक्रियेनंतर एका वर्षानं ही प्लेट आपण काढणं अपेक्षित असल्याचंही त्यानं सांगितलं.
काही कारणास्तव रणदीपला हे शक्य झालं नाही, ज्यामुळं त्याला इंफेक्शन झालं आणि त्यामुळे शस्त्रक्रिया करावी लागली.
रणदीपचे वडील एक डॉक्टर आहेत आणि त्याच्यावर शस्त्रक्रिया सुरु असताना तेसुद्धा त्याच्यासोबत होते. किंबहुना रणदीपनंही आपल्या पायातून काढलेल्या नट्स आणि प्लेटचा फोटो काढून स्वत:जवळ ठेवला.