Ranveer Singh Deepika Padukone Romantic Relationship : 'प्यार दिवाना होता है...' हे गाणं तुम्ही ऐकलंय का? ऐकलं असले तर आपण इथं त्याच्या उल्लेख का करतोय याचा अंदाज तुम्हालाही येईल. कारण, एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण या जोडीनं त्याच्या याच प्रेमाच्या नात्यामुळं सर्वांच्या नजरा वळवल्या होत्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुळात रणवीर आणि दीपिका यांनी नात्याची अधिकृत घोषणा केल्या क्षणापासून पुढे कधीच या नात्याबाबत इतरांसमोर संकोच बाळगला नाही. ती जेव्हाजेव्हा समोर आली, तेव्हातेव्हा त्यानं तिच्यावर असणारं प्रेम व्यक्त केलं. बरं, तोसुद्धा इतकं दिलखुलास प्रेम व्यक्त करू लागला ही, यांच्यासारखं दुसरं कुणालाच जमणार नाही अशीच प्रतिक्रिया चाहतेही देऊ लागले. 


चाहत्यांना या जोडीच्या नात्याती माहिती तशी उशिरानंच मिळाली. तिथं 'गोलियों की रासलीला राम-लीला' (Goliyon Ki Raasleela Ram-Leela) या चित्रपटाच्या सेटवर उपस्थित असणाऱ्या अनेकांनाच या नात्याबाबत कल्पना मिळाली होती. 


अभिनेत्यानं केली या सेलिब्रिटीची पोलखोल.... 


हल्लीच एका मुलाखतीमध्ये या चित्रपटात त्यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणाऱ्या अभिनेता गुलशन दैवेय्या यानं रणवीर आणि दीपिकाच्या नात्यावरून पडदा उचलला. 'चित्रपटाच्या पहिल्या Schedule मध्ये तर आम्ही फार काहीच पाहिलं नाही. दुसऱ्या टप्प्यातील चित्रीकरण उदयपुरमध्ये होणार होतं. तिथे आम्ही पाहिलं तेव्हा ती त्याच्या मांडीवर जाऊन बसली होती तेव्हा, अरेच्छा हे काय झालं आपल्याला कळलंच नाही अशीच सर्वांची प्रतिक्रिया होती' असं गुलशन म्हणाला. 


गाण्यच्या चित्रीकरणावेळी दोनदा तीनदा सिक्वेन्स झाले तेव्हा मात्र दीपिका तिचं काम करून निघून जायची तेव्हा आपल्याला या गोष्टी कधीच दिसल्या नाहीत असंही त्यानं मजेशीर अंदाजात म्हटलं. इथे रणवीर आणि दीपिकाच्या नात्याची नव्यानं सुरुवात झाल्यामुळं तिथं ऑनस्क्रीन केमिस्ट्रीतूनही या जोडीनं रुपेरी पडदा चांगलाच गाजवला. किंबहुना त्या चित्रपटानंतर या दोघांना एकत्र पाहून चाहतेही भारावले होते. 


हेसुद्धा वाचा : Indian Railway च्या खात्यात अचानक आले 36 कोटी रुपये; याच्याशी तुमचा आमचा काय संबंध? पाहून धक्काच बसेल 



अखेर नातं जगासमोर आलं... 


चित्रपटाच्या सेटवर सुरु झालेल्या या रोमान्सला 2018 मध्ये लग्नाचं नाव मिळालं. रणवीर आणि दीपिकानं अतिशय सुरेख सोहळ्यात लग्नगाठ बांधत सहजीवनाचा प्रवास सुरु केला. अशी ही जोडी आजही प्रेक्षकांसमोर येताच एकच कल्ला होतो.