मुंबई :  दीपिका आणि रणवीरच्या विवाहसोहळ्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक आहेत. बरेच चढउतार, कलाविश्वातील कारकिर्दीतील यश, अपयश या साऱ्या गोष्टी आणि खासगी आयुष्याचा सुरेख समतोल राखत अखेर सहा वर्षांच्या रिलेशनशिपनंतर ही टाऊनचे हे 'राम-लीला' सहजीवनाची शपथ घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इटलीतील लेक कोमो येथे 'दीप-वीर'च्या लग्नापूर्वी विविध समारंभ मोठ्या उत्साहात पार पडत आहेत. पारंपरिक पद्धतीत साखरपुडा पार पडल्यानंतर त्या ठिकाणी संगीत सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अर्थातच धमाल आणि कल्ला पाहायला मिळाला. 


पण, दीपिका मात्र काहीशी भावूक झाल्याचं कळलं. 'पिंकव्हिला'ने सूत्रांचा, प्रत्यक्षदर्शींचा हवाला देत प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार दीपिका संगीत सोहळ्यादरम्यान अतिशय भावूक झाली होती. 


प्रसिद्ध गायिका शुभा मुदगल यांचं गाणं सुरु असतेवेळी तिला भावना अनावर झाल्या आणि अखेर अश्रूंवाटे त्या सर्वांसमोर आल्या. आपल्या आयुष्यातील या सुरेख क्षणांमध्ये दीपिकाला तिच्या अश्रूनना आवरणं कठिण झालं होतं. 


आपल्या जवळच्या व्यक्तीला असं रडताना पाहून रणवीर तेथे आला, त्याने दीपिकाला प्रेमाने मिठी मारली आणि पुन्हा या मस्तानीच्या चेहऱ्यावर स्मितहास्य खुललं. 


दीपिका-रणवीरच्या विवाहसोहळ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या संगीत सोहळ्यामध्ये शुभा मुदगल यांनी एक सुरेख अशी ठुमरी सादर केली, त्याचवेळी दीपिका भावूक झाली होती. 


#DeepikaRanveerWedding