मुंबई : अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांनी काही दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अडकत एका नव्या नात्याची सुरुवात केली. पण, आता यानंतरही रणवीरला मात्र एका व्यक्तीची आठवण सतावतेय. आता ही व्यक्ती कोण? असाच प्रश्न तुमच्याही मनात घर करत आहे ना? रणवीरला दीपिकाहून जास्त आठवण सतावणाऱ्या त्या व्यक्तीचं नाव आहे, अर्जुन कपूर. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंदी कलाविश्वात सेलिब्रिटी मित्रांच्या जोड्यांमध्ये रणवीर आणि अर्जुनच्याही नावाचा समावशे होतो. पण, गेल्या काही काळापासून मात्र रणवीर आणि त्याचा हा मित्र म्हणजेच अर्जुन कपूर एकमेकांच्या फार संपर्कात नाहीत. हीच बाब रणवीरला सलतेय, ज्याविषयी त्याने थेट एक सोशल मीडिया पोस्टच लिहिली. 


आगामी 'सिंबा' या चित्रपटाच्या प्रसिद्धीदरम्यानच #Asksimba च्या निमित्ताने चाहत्यांशी संवाद साधतेवेळीच रणवीरने या आशयाचं ट्विट केलं. रणवीर आणि अर्जुनचं एकत्र येणं आणि त्यांची धमाल अनुभवणं याची आम्हाला फारच आठवण येतेय, असं एका चाहत्याने लिहिलं. 


चाहत्याच्या या ट्विटला उत्तर देत रणवीरने लिहिलं, 'हो मलाही त्याची आठवण येते, पण तो सध्या खूपच व्यग्र आहे.' अर्जुन का व्यग्र आहे, याचं कारणही रणवीरने दिलं.  तो पानिपत या चित्रपटावर लक्ष केंद्रीत करत आहे, असंही त्याने स्पष्ट केलं. रणवीरचं हे ट्विट पाहून आता अर्जुन यावर काही प्रतिक्रिा देणार का, आणि मुख्य म्हणजे जीवाभावाच्या मित्राची भेट घेणार का, हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. 



रणवीर आणि अर्जुनच्या मैत्रीविषयी सांगावं तर, 'गुंडे' या चित्रपटातून ते एकत्र झळकले होते. ज्यानंतर रुपेरी पडद्यावरच नव्हे, तर खासगी आयुष्यातही त्यांच्या मैत्रीला सुरेख बहर आला. बॉलिवूड पुरस्कार सोहळे म्हणू नका, एखादा चॅट शो म्हणू नका किंवा मग कोणाची पार्टी म्हणू नका. मित्रांची ही जोडी एकत्र आली की कल्ला होणार हे नक्कीच असतं.