मुंबई : मराठी आणि हिंदी कलावर्तुळात सर्वांच्याच आवडीची म्हणून लोकप्रिय अशी जोडी असणाऱ्या रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा यांनी काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या आयफा पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी कॅमेऱ्यांच्याही नजरा त्यांच्यावर खिळल्या होत्या. पुरस्कार सोहळ्याला आलेल्या या जोडीच्या चर्चा शमत नाहीत, तोच त्यांच्यात चक्क वाद झाल्याचं म्हटलं जाऊ लागलं. बरं हा वाद झाला, तोही थेट सोशल मीडियावर. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रितेश आणि जेनेलियामध्ये वाद झाल्यानंतर त्यांच्या चाहत्यांमध्येही दोन गट पडले. या वादामध्ये त्या दोघांनीही चक्क सोशल मीडियावर काही धमाल मीम्स पोस्ट केले. ज्याची सुरुवात रितेशने केली होती. 


जेनेलियाला टॅग करत रितेशने एक मीम शेअर केलं. 'ज्यामध्ये प्रत्येक रागवलेल्या स्त्रीमागे एक पुरुष असतो', असं लिहिलं होतं. रितेशने कुटुंबातील काही गोष्टी अशा सोशल मीडियावर पोस्ट केल्याचं पाहून जेनेलियानेही त्याला त्याच अंदाजात उत्तर देण्याचं ठरवलं. 


जेनेलियानेही रितेशच्या ट्विटला उत्तर देत एक मीम शेअर केलं. 'मी सहसा पतीच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देत नाही.... आणि जेव्हा देते, तो चुकीचाच असतो', असं त्यामध्ये लिहिलं होतं. 



रितेश आणि जेनेलियामध्ये सुरु असणारा हा वाद पाहून चाहत्यांना रहावलं नाहीस सरतेशेवटी त्यांनीही या वादात उडी घेतली. भाऊ.... महिलांपुढे कोणीही जिंकू शकलेलं नाही.... असं म्हणत कोणी रितेशची बाजू घेतली. तर, कोणी जेनेलियाची पाठराखण करत तिच्या म्हणण्याला सहमती दर्शवली. आता हे मीम्स शेअर करण्यामागचं मुख्य कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. पण, रितेश आणि जेनेलियाचं हे गोड भांडण सोशल मीडियावर मात्र बऱ्याच चर्चांना वाव देत आहे हे मात्र खरं.