मुंबई : सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकार मंडळी सतत व्यक्त होत असतात. व्यक्त होण्यासाठी त्यामागे अनेक मुद्दे कारणीभूत ठरतात. सध्या अभिनेता रितेश देशमुख अशाच एका मुद्द्यावर व्यक्त होत सद्यस्थितीविरोधात तो आवाज उठवताना दिसत आहे. (riteish deshmukh tweet)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हल्लीच एका स्टेशन हाऊस अधिकाऱ्याकडून 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी रितेशनं संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. सदर प्रकरणी पीडितेला न्याय मिळालाच पाहिले असा आग्रही सूर त्यानं आळवला आहे. 


रितेश ट्विटमध्ये काय म्हणाला ? 
एका वाहिनीच्या व्हिडीओला टॅग करत रितेशनं त्याच्या मनातील संताप व्यक्त केला. 'जर ही गोष्ट खरी असेल, तर याहून वाईट काहीच नसेल. जर रक्षकच भक्षक होत असेल तर आता लोकांनी न्याय मागायला कोणाकडे जायचं? अशांना भर रस्त्यात चोप द्यायला पाहिजे', असं लिहित त्यानं सरकारनं यावर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी त्यानं केली.


उत्तर प्रदेश (UP Rape Cases) येथील ललितपूर जिल्ह्यात 13 वर्षीय मुलीवर चौघांनी सामूहिक अत्याचार केले, त्या मुलीचं अपहरणही केलं. यानंतर पोलीस स्थानक प्रबंधक (एसएचओ)नंही तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. 



सध्याच्या घडीला स्टेशन प्रबंधकांसह सहा जणांविरोधात या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाची तक्रार केल्यानंतर आता डीआयजी स्तरावर त्याची चौकशी आणि तपासणी सुरु आहे.