अनेकदा आई-वडील... ; जेव्हा घटस्फोटाबाबत मुलांपुढे पहिल्यांदाच बोलला सैफ
सैफ- अमृताच्या वाटा वेगळ्या झाल्या.
मुंबई : अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंग यांनी हिंदी कलासृष्टीचा एक काळ गाजवला. खऱ्याखुऱ्या आयुष्यात सहजीवनाचा प्रवास सुरु करणाऱ्या या जोडीकडे मोठ्या कुतूहलानं पाहिलंही गेलं. पण, नात्यांचं गणित बिघडलं आणि सैफ- अमृताच्या वाटा वेगळ्या झाल्या.
लग्नाच्या वेळी अमृताचं वय 33 वर्षे इतकं होतं. तर, सैफ अवघ्या 21 वर्षांचा होता.
तिथं अमृता बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून नावारुपास आलेली असतानाच सैफनं पदार्पणही केलं नव्हतं.
सैफ आणि अमृतामध्ये लग्नानंतरच मतभेद दिसून आले. अखेर 13 वर्षांच्या वैवाहिक नात्यानंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
सूत्रांच्या माहितीनुसार सैफनं घटस्फोटानंतर पोटगी म्हणून अमृताला 5 कोटी रुपये इतकी रक्कम दिली होती.
वैवाहिक नात्यातून त्याला दोन मुलं होती. सारा असं मुलीचं नाव, तर इब्राहिम असं मुलाचं नाव.
घटस्फोटाबाबत आपल्या मुलांशी सैफ पहिल्यांदाच काय बोलला?
अमृतासोबत असणारं नातं संपवत असल्याचं मुलांना सांगताना सैफ मुलांना म्हणाला होता... 'हे आयुष्य फारच सुंदर आहे. याच्या काहीच तक्रारी केल्या नाही पाहिजेत. आई- वडिलांचं कधीकधी एकत्र नसणंही चांगली गोष्ट असू शकते'
सैफ आणि अमृताचा घटस्फोट झाला, त्यावेळी त्यांची लेक सारा बरीच मोठी झाली होती. आई- वडिल एकमेकांसोबत आनंदी नाहीत हे ती जाणून होती.
आई- वडील एकत्र असतात तेव्हा ते बरेच शांत असतात. पण, ज्यावेळी ते एकमेकांपासून दूर असतात तेव्हा फार आनंदी असतात, त्यांच्या वागण्यातून वेगळेपणा दिसून येतो हे साराला तेव्हा स्पष्टपणे दिसत होतं.