मुंबई : हिंदी कलाविश्वात 'नवाब' म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सैफ अली खान हा त्याच्या चित्रपटांसोबकच विविध विषयांवरील त्याच्या भूमिकांमुळेही ओळखला जातो. सैफने नेहमीच त्याची मतं अगदी परखडपणे मांडण्याला प्राधान्य देतो. सध्या त्याच्या अशाच भूमिका आणि काही मतं चर्चेला वाव देत आहेत. अभिनय विश्वातील योगदानासाठी सैफला भारत सरकारकडून 'पद्मश्री' या मानाच्या पुरस्काराने गौरवण्यात आले होते. पण, हा पुरस्कार परत करण्याचा विचारच त्याच्या मनात घर करून होता. अभिनेता अरबाज खान याच्या 'पिंच' या चॅट शोमध्ये सैफने याविषयीचा खुलासा केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हॉटेलमधील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी आणि त्याला पद्मश्री' मिळण्याप्रकरणी एका सोशल मीडिया युजरने सैफ अली खानचा उल्लेख  two bit thug म्हणून केला होता. 'पद्मश्री' विकत घेतल्याचं म्हणत त्याला अभिनही येत नसताना 'सेक्रेड गेम्समध्ये भूमिका मिळतेच कशी?, असा प्रश्ही त्या युजरने उपस्थि केला होता. ज्यावर उत्तर देत, सैफने काही गोष्टी स्पष्ट केल्या. 'पद्मश्री' ही फारच मोठी गोष्ट आहे आणि भारत सरकारला लाच देणं हे काही माझ्यासारख्याचं काम नाही, असं उपरोधिक विधान देत त्याने या युजरला उत्तर दिलं. 


'माझ्या मते मी तो पुरस्कार स्वीकारणार नव्हतो. कारण, या क्षेत्रात असेही काही (वरिष्ठ) कलाकार आहेत ज्यांना माझ्याहून अधिक प्राधान्य दिलं जाणं अपेक्षित आहे, ते या पुरस्कारास पात्र आहेत. त्यामुळे ही गोष्ट माझ्यासाठी थोडी संकोचलेपणाची होती. असं म्हणत अर्थात हा पुरस्कार अशाही काही कलाकारांना मिळाला आहे, ज्यांना ते मिळणं अपेक्षित नव्हतं ही बाबही अधोरेखित केली. 



आपण तो पुरस्कार स्वीकारणारच नव्हतो. पण, वडिलांच्या सांगण्यावरुन तो पुरस्कार स्वीकारल्याचं सैफने या मुलाखतीत सांगितलं. 'तू सध्या या भारत सरकारला कोणा एका गोष्टीसाठी नकार देण्याच्या पदावर नाहीस', असं सैफच्या वडिलांनी त्याला सांगितलं होतं. ज्या कारणास्तव त्याने हा पुरस्कार स्वीकारला. 'पिंच'मध्ये त्याने या पुरस्काराचं आपल्या आयुष्यातील महत्त्वही स्पष्ट केलं. 


अरबाजच्या आणि नेटकऱ्यांच्या प्रश्नांना प्रतिक्रियांना सैफने त्याच्या नेहमीच्याच शैलीत उत्तरं दिली. ज्यामध्ये हॉटेल मारहाण प्रकरणीही त्याने स्पष्टीकरण केलं. अरबाजचा हा कार्यक्रम गेल्या काही दिवसांपासून बराच प्रकाशझोतात आहे. सोशल मीडियावर येणाऱ्या प्रतिक्रिया आणि त्यावर सेलिब्रिटींची नेमकी काय मतं आहेत, याचा 'पिंच'मधून अगदी सहज उलगडा होतो. सैफची ही मुलाखतही त्याचाच एक प्रत्यत आहे, असं म्हणायला लागेल.