...म्हणून करीनासोबत स्क्रीन शेअर करण्यास सैफचा नकार
बी- टाऊनच्या नवाबाचं हे वक्तव्य पाहता...
मुंबई : रुपेरी पडद्यावर काही जोड्या या प्रेक्षकांची विशेष पसंती मिळवून जातात. अशाच काही जोड्यांपैकी एक म्हणजे अभिनेत्री करीना कपूर आणि अभिनेता सैफ अली खान. पती- पत्नी म्हणून सेलिब्रिटी विश्वात गाजलेली ही जोडी गेल्या बऱ्याच काळापासून रुपेरी पडद्यावर मात्र एकत्र झळकलेली नाही.
आता खुद्द सैफ अली खाननेच याविषयी महत्त्वाची गोष्ट स्पष्ट केली आहे.
'ओमकारा', 'कुरबान', 'टशन' यांसारख्या चित्रपटांतून करिनासोबत स्क्रीन शेअर करणाऱ्या सैफने 'डीएनए'शी संवाद साधताना याविषयीच्या काही गोष्टी नमूद केल्या.
गेल्या काही वर्षांमध्ये मी करीनासोबत एखाद्या चित्रपटात काम करण्यास नकार द्यायचो. कारण, व्यक्तीगत आयुष्य़ आणि कामामध्ये काहीतरी फरक असावा, असं माझं ठाम मत होतं. पण, वडील मन्सूर अली पतौ़डी यांच्य़ा कुटुंबप्रमुख म्हणून असणाऱ्या रिक्ततेमुळे आता या गोष्टींकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोन बदलला आहे, असं तो म्हणाला.
बी- टाऊनच्या नवाबाचं हे वक्तव्य पाहता येत्या काळात तो आणि करीना रुपेरी पडद्यावर झळकणार का, या प्रश्न विचारला असता सैफने एक महत्त्वाचा मुद्दा इथे मांडला.
एखादी चांगली स्क्रीप्ट आली तर करीनासोबत पुन्हा स्क्रिन शेअर करण्याचा विचार नक्कीच करेन असं त्याने स्पष्ट केलं.
ज्यावेळी मी करीनासोबत असतो तेव्हा मी सहसा परफॉर्म करत नाही. काही बाबतीत मी रटाळ होऊन जातो. असं खुद्द सैफनेच सांगितलं होतं.
सैफचं हे वक्तव्य पाहता येत्या काळात तो आणि करीना कोणत्या चित्रपटात एकत्र दिसणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.