मुंबई : 'यारों का यार', अशी ओळख असणारा अभिनेता सलमान खान आणि त्याच्या खासगी आयुष्याबाबत आता तसं पाहिलं तर काही नवं नाही. या अभिनेत्याचे अफेअर्स, त्याच्या खासगी आयुष्यात आलेली वादळं या साऱ्याचीच चाहत्यांना कल्पना आहे. आजही अनेकांना आश्चर्य वाटतं की सलमान आजही अविवाहित कसा? तो कधी कोणाच्या प्रेमात पडलाच नाही? कधी कोणाला त्याच्याशी लग्न करावंसं वाटलं नाही? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असं नाहीये. सलमानलाही जीवाभावाची जोडीदार भेटली, त्या दोघांनी एकमेकांवर प्रेमही केलं. इतकंच काय, तर त्यांचं लग्नही ठरलं पत्रिकाही छापल्या गेल्या. पण, काहीतरही बिनसलं आणि हे लग्न झालंच नाही. 


सलमानशी कधी एकेकाळी लग्न करु पाहणारी ही अभिनेत्री होती, संगीता बिजलानी. सलमान खान (Salman Khan) आणि संगीता बिजलानी (Sangeeta Bijlani) यांची मैत्री तेव्हा झाली जेव्हा तो शाहीन जाफरीला डेट करत होता. 


तेव्हा शाहीन सलमानची पहिली प्रेयसी होती, तर संगीताचा ब्रेकअप झाल्यामुळं ती यातून सावरु पाहत होती. पुढे सलमान आणि संगीताची मैत्री वाढली, मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. हे प्रेम इतकं बहरलं की सलमान आणि संगीताचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं. पत्रिकाही छापल्या गेल्या होत्या. 


काही मुलाखतींमध्ये खुद्द समान आणि संगीतानंच याचा खुलासा केला होता. पत्रिका छापलेल्या असतानाही हे नातं तुटलं, याला कारण ठरलं संगीताच्या मनात असणारी भीती आणि सलमाननं केलेला विश्वासघात. 



संगीताशी नातं असतानाही सलमान सोमी अली हिच्यासोबत होता. ही बातमी जेव्हा संगीताच्या कानावर आली तेव्हा तिनं लग्नासाठी स्पष्ट नकार दिला. गोष्टींना इथंच पूर्णविराम लागला. 



पुढे संगीतानं काही वर्षांनी 1996 मध्ये क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन याच्याशी लग्न केलं. 2010 मध्ये त्यांनी या नात्यातून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, सलमान आणि संगीतामध्ये असणारं प्रेमाचं नातं अपयशी ठरलं तरीही त्यांची मैत्री मात्र कायम आहे. आजही खान कुटुंबातील अनेक कार्यक्रम आणि समारंभांना संगीता हजेरी लावताना दिसते.