बॉलिवूडचा दंबग सलमानच्या जीवावर कोण उठलंय?
बॉलिवूडचा दंबग खान अर्थात सलमान खानला जीवे मारण्याची धमकी आलीय.
मुंबई : बॉलिवूडचा दंबग खान अर्थात सलमान खानला जीवे मारण्याची धमकी आलीय. एका निनावी पत्राद्वारे त्याला ही धमकी देण्यात आलीय. या धमकीमुळे बॉलिवूडविश्व हादरलंय. आता या धमकीचा खरा सूत्रधार कोण आहे? सलमानला धमकी देण्यामागचं नेमकं कारण काय? याचा शोध मुंबई पोलीस घेतायेत. (bollywood actor salman khan give death threten know what connetcion with gangster lawrence bishnoi)
बॉलिवूड सुपरस्टार सलमान या ना त्या कारणानं कायम चर्चेत असतो. मात्र यावेळी चर्चा आहे ती सलमानाला आलेल्या धमकीची..सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. त्यामुळे बॉलिवूड विश्वात खळबळ माजलीय. एका पत्राद्वारे सलमानला ही धमकी देण्यात आलीय.
धमकी देणाऱ्यांनी या पत्रात सलीम खान आणि सलमान खान लवकरच तुमची अवस्था मूसेवालासारखी होईल असं म्हंटलंय. धमकीच्या पत्रानंतर मुंबई पोलीस ऍक्शन मोडवर आलेत. सलमानच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ करण्यात आलीय.
सलमानच्या धमकी प्रकरणात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचं नाव समोर येतंय. हा तोच लॉरेन्स बिश्नोई आहे ज्यानं 2018 मध्ये जेलमधून सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. याचा संबंध काळविट प्रकरणाशी जोडला जातोय. गँगस्टर लॉरेन्स हा बिश्नोई समाजातील आहे.
काळवीट हत्या प्रकरणात सलमानचं नाव आल्यानं लॉरेन्सचा त्याच्यावर राग होता. त्यामुळेच त्यानं ही धमकी दिल्याचं बोललं जातंय. आताच्या धमकीतही पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला हत्येप्रमाणेच कट आखला जात होता का ? असा संशय व्यक्त होतोय.
सलमानच्या हत्येचा मास्टर प्लॅन?
लॉरेन्स बिश्नोई सध्या तिहार जेलमध्ये असून तिथूनच तो आपली टोळी ऑपरेट करतोय. लॉरेन्सच्या 700 गुंडांच्या टोळीचं नेटवर्क संपूर्ण देशभरात पसरलंय. विशेष म्हणजे तिहारपासून कॅनडापर्यंत लॉरेन्स बिश्नोईचे शार्प शूटर असल्याचंही सांगण्यात येतंय. 2018 मध्ये रेडी सिनेमाच्या शूटिंगवेळी लॉरेन्सनं सलमानवर हल्ला करण्याचा प्लॅनही आखला होता. मात्र त्याला त्याच्या आवडीचं हत्यार मिळू शकलं नाही.
आता पुन्हा एकदा सलमानला जीवे मारण्याची धमकी आलीय. आता ही धमकी खरंच लॉरेन्स बिश्नोईनं दिली की आणखी कुणी? याचा शोध घेण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर असणारय.