Salman Khan on Mannat: आपल्यापैंकी प्रत्येकाचेच एक स्वप्न असते की आपलंही एक आलिशान घर असावं. मग ती व्यक्ती कोणी असो. ती अगदी मध्यवर्गीय व्यक्ती असो वा कुणी सेलिब्रेटी. अशाच एका सेलिब्रेटीनेही असेच एक भव्य स्वप्न पाहिले होते परंतु त्याचे स्वप्न मात्र काही केल्या पुर्ण झाले नाही. ही सेलिब्रेटी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ती व्यक्ती आहे सलमान खान म्हणजेच बॉलीवूडचा भाईजान. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेता सलमान खान याला किंग खान शाहरूखचा मन्नत हा बंगला विकत घेण्याची कोण इच्छा झाली होती. शाहरूख खान आणि सलमान खान दोघेही बॉलीवूडचे करण आणि अर्जून आहेत. दोघांवरही अख्खं बॉलीवूड फिदा आहे. या दोघांची जोडीही खूप फेमस आहे आणि आजही दोघांमध्ये चांगली मैत्री आहे. 


सलमान खानने एका मुलाखतीत शाहरूख खानचा मन्नत हा बंगला घेण्याचे स्वप्न कबूल केले होते. त्याला मुलाखतीदरम्यान विचारण्यात आले होते की शाहरूख खान यांची अशी कोणती गोष्ट तुम्हाला हवी आहे. त्यावेळी सलमानने शाहरूख खानच्या बंगल्याचे म्हणजेच मन्नतचे नाव घेतले होते. 


सलमान खानने एका मुलाखतीत सांगितले की आज शाहरूख खान ज्या मन्नत बंगल्याचा मालक आहे. तो मन्नत बंगला पहिल्यांदा त्याला ऑफर करण्यात आला होता. मात्र सलमान खानच्या वडिलांनी सलमानला तो बंगला खरेदी करण्यास नकार दिला होता. सलमान एवढा मोठा बंगला घेऊन काय करणार असे ते म्हणाले होते. त्यामुळे सलमानला आलेली ही ऑफर त्यांनी नकारली आणि मन्नत बंगला घेण्यास त्यांनी सलमानला विरोध केला. 


 'मन्नत'ची ही आहे खासियत 
शाहरुख खानचा 'मन्नत' हा बंगला एखाद्या महालापेक्षा कमी नाही. मुंबईतील लोक त्याचा बंगला पाहायला आणि फोटो काढायला दूरून दूरून येतात. शाहरूखचा बंगला 27,000 स्क्वेअर फूट पेक्षा जास्त परिसरात बांधला आहे. या बंगल्यात शाहरुखचे ऑफिस, जिम, स्विमिंग पूल आणि थिएटर देखील आहे. शाहरुखने हा बंगला 2001 मध्ये 13.32 कोटी रुपयांना खरेदी केला होता. ज्याची किंमत सध्या 200 कोटींहून अधिक आहे.


सलमान खान त्याच्या आगामी 'कभी ईद कभी दिवाळी' आणि 'टायगर-3' या चित्रपटातून दिसणार आहे. तर दुसरीकडे शाहरुख खान 'पठाण' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे याशिवाय तो 'डंकी' चित्रपटातही दिसणार आहे.