भाईजान सलमान वारंवार वापरतो `हे` जॅकेट; काय आहे खास कनेक्शन?
पाहा त्यानं कधी आणि कुठे वापरलंय हे जॅकेट
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman khan) हा त्याच्या चित्रपटांसोबतच हटके स्टाईल स्टेटमेंटसाठी ओळखला जातो. मागील कित्येक दशकांपासून चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या सलमाननं एखादी नवी स्टाईल आणली आणि तो ट्रेंड सेट नाही झाला असं फार क्वटचितच होतं. नवनवीन स्टाईल फॉलो करणारा सलमान, काही बाबतीत मात्र अगदी तुमच्या आमच्यासारखाच आहे.
अमुक एक कपडा आपल्या आवडीचा किंवा अतिशय खास म्हणून तो वारंवार वापरण्याकडे आणि जपून ठेवण्याकडे सतत आपला कल दिसून येतो. सलमानलाही अशाच त्याच्या एका लाल रंगाच्या जॅकेटमध्ये पाहिलं गेलं आहे.
अनेकदा त्यानं या जॅकेटचा वापर केला आहे. पण, त्याकडे कोणाचं लक्ष नाही गेलं. अर्थात आता जेव्हा जाणीवपूर्वकपणे त्याच्या या जॅकेटचा मुद्दा समोर आला तेव्हा मात्र अरेच्चा खरंच की... सलमाननं बऱ्याचदा हे जॅकेट घातलंय अशाच प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या.
'एक था टायगर', 'टायगर जिंदा हैट आणि 'बजरंगी भाईजान' या चित्रपटांच्या सेटवर सलमानला या जॅकेटमध्ये पाहिलं गेलं आहे. आता तर रशियामध्ये टायगर 3 च्या सेटवरही तो याच जॅकेटमध्ये दिसत आहे.
वारंवार वापरात आणल्या जाणाऱ्या या जॅकेटचं नेमकं इतकं महत्त्वं काय आहे, त्यामागे काही खास गुपित दडलंय का याचा खुलासा अद्याप झालेला नाही. किंबहुना याचा खुलासा खुद्द सलमानच करु शकतो. पण, तूर्तास त्याचा हा जॅकेट लूक मात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे आणि तो हे जॅकेट काही बदलण्याच्या Mood मध्ये नाही असंच म्हणावं लागेल.