मुंबई : coronevirusचा प्रादुर्भाव वाढत असतानाच देशभरात लॉकडाऊन काटेकोरपण पाळत या विषाणूशी झुंज दिली जात आहे. या परिस्थितीमध्ये अभिनेता समान खानसुद्धा मायानगरी मुंबईपासून आणि त्याच्या कुटुंबापासून दूर आहे. बी- टाऊनचा हा दबंग खान सध्या त्याच्या पनवेल येथील फार्महाऊसवर वास्तव्यास असल्याचं म्हटलं जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही कुटुंबीयांची त्याला इथे साथ आहे. इतरांना सलमानने घरातच राहण्याचा सल्लाही दिला आहे. पण, वडिलांपासून दूर असण्याचं दु:ख त्यालाही असल्याचं मागील एका व्हिडिओमध्ये पाहायला मिळालं होतं. सलमानचं हे भावूक होणं पाहिल्यानंतर आता चाहत्यांना त्याचा आणखी एक नवा अंदाज पाहायला मिळत आहे. 


Breakfast with my love... अशा कॅप्शनसह सलमानने एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. जो पाहता क्वारंटाईन आणि लॉकडाऊनच्या काळात त्याला प्रेमातं साथीदार मिळाल्याचं स्पष्ट होतं आहे. आता त्याचं हे कॅप्शन वाचून किमान हेच चित्र स्पष्ट होत आहे. पण, मुळात कोणा व्यक्तीच्या रुपात नव्हे, तर सलमानने ही प्रेमाची उपमा एका प्राण्याला दिली आहे. 


काळ्या रंगाच्या एखा सुरेख अश्वासह सलमान सकाळचे काही निवांत क्षण व्यतीत करताना दिसत आहे. इतकंच नव्हे, तर घोडा खात असणारा पाला, खुद्द भाईजानही खाताना दिसत आहे. सलमानचं प्राणीप्रेम हे काही नवं नाही. त्यातच आता हा व्हिडिओ आणखी भर टाकत आहे. 



 


प्राथमिक पातळीवर २१ दिवसांच्या या लॉकडाऊनच्या काळात कोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येकानेच घरात राहण्याला प्राधान्य दिलं. सेलिब्रिटी मंडळींनीसुद्धा याचं पालन केलं. कोणी या काळात स्वत:मधील काही कलागुणांना वाव दिला, तर कोणी नात्यांचे बंध आणखी घट्ट केले. सलमानचा हा व्हिडिओ पाहता, त्याने प्राणीमात्रांसोबतचं खास नातं खऱ्या अर्थाने जपलं असं म्हणायला हरकत नाही.