धमक्यांनंतर सलमान खानला Y प्लस सुरक्षा, आता बॉडीगार्ड शेराला करावं लागतं हे काम
Salman Khan Security : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून वारंवार धमक्या दिल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर सलमान खानच्या सुरक्षेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली असून त्याला Y प्लस सुरक्षा पुरवण्यात आली आहे.
Salman Khan Security : अभिनेता सलमान खान आणि त्याचं कुटुंब सध्या कठिण परिस्थितीतून जात आहे. निकटवर्तीय बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर (Baba Siddique Murder Case) खान कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. या पार्श्वभूमीवर सलमान खानच्या (Salman Khan) सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. सलमान खानला Y+ सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे. त्याच्या सुरक्षेत दोन शिफ्टमध्ये जवळपास 60 जवान तैनात करण्यात आले आहेत. यात सुरक्षा दलाच्या दोन ते तीन गाड्या आणि चार एनएसजी कमांडोंचा समावेश असतो. याशिवाय सलमानसाठी बुलेट प्रुफ गाडीही तैनात असते.
सलमानसोबत शेराची साथ
इतक्या सुरक्षाव्यस्थेनंतरही बॉडिगार्ड शेरा (Shera) हा सलमान खानसोबत सावली सारखा असतो. शेरा हा जवळपास 29 वर्ष सलमान खानचा बॉडीगार्ड म्हणून काम करतोय. देशात परदेशात कोठेही असला तरी शेरा सलमानसोबत कायम असतो. लॉरेन्स बिश्नोई गँगकडून मिळत असलेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर सलमानला व्हाय प्लस सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली असली तरी सलमानचा सर्वात जास्त भरोसा हा शेरावरच आहे. केवळ शेराला सलमानबरोबर प्रत्येक ठिकाणी एन्ट्री मिळते.
सलमान कोणत्याही कार्यक्रमाला जाणार असला तर त्याच्या आधी शेरा त्या ठिकाणी स्वत: जाऊन जागेची पाहाणी करतो. त्या ठिकाणच्या पोलीस अधिकारी, खासगी सुरक्षा अधिकाऱ्यांशी स्वत: चर्चा करतो. सलमान खानला पाहण्यासाठी चाहत्यांचीही मोठी गर्दी होते. त्यामुळे गर्दीपासून वाचवण्याचं कामही शेराला करावं लागतं.
सलमानची व्हाय प्लस सुरक्षा कशी आहे?
सलमान खानला व्हाय प्लस सुरक्षा पुरवण्यात आली आहे. यात 11 जवानांचा समावेश असतो. अकरा जवानांपैकी चार ट्रेंड कमांडो आहेत जे शस्त्र चालवण्यात माहित असतात. सुरक्षेत तैनात असलेल्या जवानांकडे आधुनिक पिस्तुल, अत्याधुनिक एमपी फाईव्ह गन आणि एके-47 सारखी शस्त्र असतात. याशिवाय सलमान खानचे 35 खासगी बॉडीगार्डस आहेत. हे सर्व खासगी बॉडीगार्डसवर शेराचं नियंत्रण असतं. सलमान खानभोवती सुरक्षेची तीन कडी आहेत. याशिवाय ज्या पोलीस स्थानकाच्या हद्दीत सलमान खान जातो तिथले पोलीसही सलमान खानच्या सुरक्षेत तैनात असतात.
सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा पोलीस स्थानकात आधीच माहिती देऊन ठेवतो त्यानंतर लोकल पोलीसांकडून त्या ठिकाणी सुरक्षा पुरवली जाते. सलमानच्या मुंबईतल्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर चोवीस तास 25 हून अधिक शस्त्रधारी पोलीस तैनात आहेत. याशिवाय सलमान खान जेव्हा बाहेर पडतो तेव्हा त्याच्या ताफ्यात 8 ते 9 गाड्या असतात. यातल्या चार गाड्या पोलिसांच्या असतात.
ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी पोहोचल्यावर लगेच गाडीतून खाली उतरण्याची सलमानला परवानी नाही. आधी सुरक्षा रक्षक आसपासची पाहाणी करतात, त्यानंतर सलमानला कारमधून खाली उतलण्यासाठी हिरवा सिग्नल दिला जातो. त्यानंतरच सलमान कारमधून बाहेर पडतो. सलमान स्वत:ही 32 कॅलिबर पिस्तुल स्वत:जवळ ठेवतो. याचं लायसन्स मुंबई पोलिसांकडून मिळालं आहे.