मुंबई : अभिनेता सलमान खान आणि त्याच्या लोकप्रियतेबाबत काही वेगळं सांगण्याची गरज नाही. सलमान जिथं जातो तिथं त्याच्या चाहत्यांचा घोळका पाहायला मिळतो. अशा या भाईजान सलमाननं वापरलेल्या एका वस्तूला इतकी किंमत मिळाली आहे, जे जाणून तुम्हाला धक्काच बसेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सहसा सेलिब्रिटींनी वापरलेल्या वस्तूंचा लिलाव केला जातो, अनेक सामाजिक कामांमध्ये यातून आलेला पैसा वापरला जातो. अशाच एका लिलावामध्ये सलमान खाननं 'जीने के है चार दिन' या गाण्यामध्ये वापरलेल्या टॉवेलचा लिलाव करण्यात आला. 


सलमानच्या या टॉवेलसाठी तब्बल 1 कोटी 42 लाख रुपये इतकी किंमत मोजण्यात आली. यापूर्वी लिलावातील अनेक गोष्टींना मोठी रक्कम दिली जाते हे आपण पाहिलं असेल. पण, एका टॉवेलसाठी इतके रुपये मोजले जाणं सर्वांनाच थक्क करुन जात आहे. त्यामुळं 'भाईजान की बात ही कुछ और है...' असंच चाहते म्हणत आहेत. 



दरम्यान, 'जीने के है चार दिन' हे गाणं, 'मुझसे शादी करोगी' या चित्रपटातील आहे. या चित्रपटामध्ये सलमानसह अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा झळकले होते. साजिद नाडियादवाला यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती. तर, डेविड धवन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. 2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांची चांगली दाद मिळाली होती.