मुंबई : संजूबाबा.... म्हणजेच अभिनेता संजय दत्त याने नुकताच त्याचा ६० वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाच्या निमित्ताने त्याने एका पार्टीचंही आयोजन केलं होतं. संजय दत्तच्या वाढदिवसाचं औचित्य साधत कलाविश्वातूनही त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. अर्थात यामध्ये चाहत्यांच्याही शुभेच्छांचा समावेश होता. पण, त्याच्या एका कृतीमुळे मात्र चाहत्यांची निराशा झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरवर्षीच संजय दत्तच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्या मुंबईतील पाली हिल येथे असणाऱ्या निवासस्थानी चाहत्यांची गर्दी पाहायला मिळते. यंदाच्या वर्षीही तेच चित्र पाहायला मिळालं. पण, यावेळी चाहत्यांची गर्दी संजय दत्तला मात्र काहीशी अडचणीत आणणारी ठरली. 


गर्दीचा लोट पाहता संजय दत्त चा पारा चढला. त्याने चाहत्यांवर आवाजही चढवल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे चाहतेही काहीसे निराश झाले. सहसा माध्यमांचे प्रतिनिधी, छायाचित्रकार आणि चाहत्यांच्या वर्तुळात संजय दत्त कायमच खेळीमेळीच्या वातावरणात वावरत असतो. या साऱ्यांशीच त्याचं खास नातं आहे. पण, त्याचं हे रुप पाहता अनेकांनाच धक्का बसला.




संजूबाबाचा यंदाचा वाढदिवस हा एका कारणामुळे खास होता. ते कारण होतं, त्याच्या आगामी चित्रपटाचा टीझर. स्वत:च्याच निर्मिती संस्थेअंतर्गत साकारल्या गेलेल्या 'प्रस्थानम' या चित्रपटाच्या टीझरमधून संजय दत्त पुन्हा सर्वांचं लक्ष वेधून गेला.