मुंबई : अभिनेता संजय दत्त (sanjay dutt) हा त्याच्या अनोख्या आणि दमदार अंदाजासाठी कायमच ओळखला जातो. काम आणि कुटुंब यांच्यामध्ये सुरेख सांगड घालणाऱ्या या अभिनेत्याच्या मुलीनं म्हणजेच त्रिशालानं आता सोशल मीडियावर अनेकांचं भान हरपलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजुबाबाची लेक, त्रिशाला हिनं नुकतंच तिचा बिकीनीमधील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती बिकीनीमध्ये पाठमोरी बसलेली दिसत आहे. जंगल, खळखळ वाहणारा ओढा आणि मोठमोठाले खडक यांच्यामध्येच ती बसली आहे.


पाठमोऱ्या बसलेल्या त्रिशालानं मोकळे सोडलेले केस आणि तिचा बांधा या फोटोच्या जमेच्या बाजू. फोटो शेअर करत त्रिशालानं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'तुम्हाला 66 मिलियन वर्षांपूर्वीच्या काळात नेताना.... सध्या मी डायनासोर शेधतेय'. त्रिशालाचा हा फोटो सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.



तिचा हा फोटो पाहून नेटकरीही हैराण आहेत. कारण, आघाडीच्या अभिनेत्रीला लाजवेल असाच फिटनेस त्रिशालानं नेहमीप्रमाणं यावेळीही दाखवला आहे. बिकीनी फोटो शेअर करण्याची ही तिची पहिलीच वेळ नाही. यापूर्वीसुद्धा तिनं असे काही फोटो शेअर केले आहेत.


बॉयफ्रेंडच्या पुण्यतिथी दिवशी भावनिक पोस्ट लिहित तिनं त्याच्यासोबतचं नातं व्यक्त केलं होतं. 2 जुलै 2019 ला त्रिशालाचा इटालियन बॉयफ्रेंड निधन पावला होता. त्याच्या निधनानंतर ती कोलमडून गेली होती. पण, नंतर तिनं या दु:खातून स्वत:ला सावरलं.