मुंबई : अभिनेता संजय दत्त याची खलनायकी भूमिका असणारा 'केजीएफ 2' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. चित्रपटात संजय दत्त यानं साकारलेलं 'अधीरा' हे पात्र प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरलं. आता मुद्दा असा की शेवटी या चित्रपटामध्ये संजूबाबाचा मृत्यू दाखवण्यात आला आहे. अभिनेत्याच्या चाहत्यांना असा शेवट फारसा आवडला नसावा पण, त्याचा मोठा फायदा मात्र निर्मात्यांना झाला हे नाकारता येणार नाही. (Sanjay Dutt Movies )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधीही काही असे चित्रपट होते, ज्यामध्ये संजूबाबाचा मृत्यू दाखण्यात आला होता. मुख्य म्हणजे त्या प्रत्येकवेळी चित्रपटाच्या कमाईत चांगलीच भर पडली होती. 


असाच एकत्र चित्रपट म्हणजे 'नाम'. या यादीतला दुसरा चित्रपट म्हणजे 'खलनायक'. संजय दत्तची नकारात्मक भूमिका असणारा एक गाजलेला चित्रपट. या चित्रपटातही शेवटी त्याचा मृत्यू होतो. 




या अभिनेत्यानं दमदार भूमिका साकारलेल्या चित्रपटांपैकी एक म्हणजे 'वास्तव'. चित्रपटात संजूबाबानं एका गुंडाची भूमिका साकारली होती, ज्याचा शेवटी मृत्यू होतो. बॉक्स ऑफिसवर त्याचा हा चित्रपट कमाल गाजला होता. 



'अग्निपथ'मध्ये संजय दत्तनं साकारलेल्या 'कांचा चीना'चा शेवटी मृत्यूनंच होतो. पण, इथं खलनायकाचा मृत्यू झालेला असला तरीही कमाईवर मात्र पूर्णविराम लागलेला दिसला नाही. कारण कमाईच्या बाबतीत या चित्रपटानं निर्मात्यांना मोठा फायदा करुन दिला होता. 



कोणा एकाचा मृत्यू या चित्रपट व्यवसायामध्ये कोणासाठीतरी कसा फायद्याचा ठरू शकतो, हेसुद्धा या चित्रपटांनी दाखवलं आहे. गणित हादरवणारं असलं तरीही तेच सत्य आहे....