कपूर कुटूंबाच्या मुलामुळे `त्या` दोघी आजही अविवाहित...
संजय कपूरच्या लव्ह लाईफला सुरुवात झाली जेव्हा...
Sanjay Kapor Love Story: बॉलीवूड अभिनेता संजय कपूर त्याचा भाऊ सुपरस्टार अनिल कपूरप्रमाणेच देखणा आणि मोहक अभिनेता आहे. चित्रपटांमध्ये त्यांचे नशीब फारसे रंगले नसले तरी तो त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत राहिला आहे. संजय कपूरच्या लव्ह लाईफला सुरुवात झाली जेव्हा त्याने फिल्म इंडस्ट्रीत प्रवेश केला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार संजय आणि प्रसिद्ध अभिनेत्री तब्बू यांनी एकमेकांना डेट केले होते. दोघांनी 1995 साली 'प्रेम' चित्रपटात एकत्र काम केले होते. संजयचा हा पहिलाच चित्रपट होता. मात्र हा चित्रपट तयार होयला 6 वर्षे लागली आणि जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा चित्रपट तो फ्लॉप ठरला. पण या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान संजय आणि तब्बू एकमेकांना पसंत करू लागले आणि एकमेकांच्या प्रेमात पडले. यापूर्वी एका मुलाखतीत संजयने तब्बूवर क्रश असल्याची कबुलीही दिली होती असं बोललं जाते.
मात्र तब्बू आणि संजयने त्यांच्या नात्यावर कधीही काहीही उघडपणे सांगितले नाही. पण 90 च्या दशकात दोघांच्या नात्याची सगळीकडे चर्चा होती. दोघेही अनेकदा सार्वजनिक ठिकाणी एकमेकांसोबत दिसले. संजय आणि तब्बू बराच काळ एकमेकांना डेट करत होते. आज दोघेही एकमेकांशी बोलत नाहीत.
तब्बूला डेट केल्यानंतर संजय कपूरने मिस युनिव्हर्स अभिनेत्री सुष्मिता सेनला डेट केले. 'सिर्फ तुम' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सुष्मिता सेन आणि संजय कपूर यांची भेट झाली होती. यादरम्यान संजय सुष्मिताच्या प्रेमात पडला होता. या चित्रपटातील दोघांच्या 'दिलबर दिलबर' या सिझलिंग गाण्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. मात्र, काही काळ डेट केल्यानंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
सुष्मितापासून वेगळे झाल्यानंतर संजय कपूरची महीप संधूशी भेट घडली. दोघांनीही एका चित्रपटात एकत्र काम केले आहे. मात्र हा चित्रपट समीक्षकांसोबतच प्रेक्षकांनाही आवडला नाही. महीप प्रसिद्ध ज्वेलरी डिझायनर आहे. चित्रपटांमध्ये नशीब आजमावण्यासाठी ती ऑस्ट्रेलियाहून भारतात आली होती. काही काळ डेट केल्यानंतर दोघांनी 1997 मध्ये लग्न केले. यानंतर संजय आणि महीप यांना शनाया आणि जहाँ कपूर नावाची दोन मुलं आहेत.