Maheep Kapor Bold Photoshoot: सध्या बॉलीवूडमध्ये चर्चा आहे अभिनेत्यांच्या बायकांची. (Bollywood Actor Wives) सोशल मीडियामुळे आता सगळंच सुखकर झालं आहे. एका मिनिटापेक्षाही कमी कालावधीमध्ये सोशल मीडियवरून आपल्याला सगळ्यांचे अपडेट्स मिळत असतात. त्यातून बॉलीवूडच्या सेलिब्रेटींपासून ते अगदी सर्वसामान्यांपर्यंत तसेच सोशल मीडिया इन्फ्लूएनर्सपासून ते विविध गोष्टींचे अपडेट्स आपल्याला मिळत असतात. त्याचबरोबर सुपरस्टार अभिनेत्यांच्या बायकांचीही सोशल मीडियावर चांगलीच चर्चा असते. (bollywood actor sanjay kapoor wife hot photoshoot goes viral)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या अशाच एका अभिनेत्रीची चर्चा सर्वत्र सुरू आहे आणि ती म्हणजे अभिनेत्री महीप कपूर (Actress Maheep Kapoor). अभिनेता संजय कपूरची बायको महीप कपूर सध्या सोशल मीडियावर आपल्या हॉट फोंटोनी सगळीकडे धुमाकूळ घालते आहे. महीप कपूर सध्या 'फॅब्यूलस लाईफ ऑफ बॉलीवूड वाईफ्स' (Fabulous Life of Bollywood Wives) या वेबसिरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या वेबसिरिजमधून महीप कपूर हिनं काही धक्कादायक खुलासे केले आहेत. आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि संजय कपूरसोबतच्या आपल्या नात्याविषयीही तिनं धक्कादायक खुलासा केला आहे. 


आणखी वाचा - आई नीतू कपूरनं Ranbir चा फोटो शेअर करतानाच नेटकरी म्हणाले...


महीप कपूरनं आपल्या इन्टाग्राम पेजवरून आपलं नवं फोटोशूट शेअर केलं आहे. या फोटोंमध्ये महीप कपूर खूपच किलर लूकमध्ये दिसत आहे. तिच्या फोटोंखालील लाईक्स आणि कमेंट्स थांबण्याचे नावही घेत नाहीयेत. संजय कपूरची पत्नी महीप कपूर देखील बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा कमी नाही. महीप कपूरनं आपल्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. सध्या हे फोटो सर्वत्र धुमाकूळ घालतायत.


आणखी वाचा - Jaya Bachchan यांची नातं का झाली नाराज; आजी आणि नात यांच्यात वादाचं कारण काय?



महीप कपूरने लाल रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे. या लाल लेहेंग्यात ती खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोंमध्ये महीपने अतिशय आकर्षक असे दागिने घातलेले आहेत. तिच्या ड्रेसवर ही ज्वेलरी खूपच उठावदार दिसते आहे. तिचे हे आकर्षक फोटो पाहून तिनं आपल्या मुलीलाही मागे सोडलं आहे.