... कपूर कुटुंबापुढे आर्थिक अडचण; पहिल्यांदाच अभिनेत्याच्या पत्नीचं लक्षवेधी वक्तव्य
आम्हाला हिणवलं गेलं...; आर्थिक अडचणीत असलेल्या Mrs. Kapoor नं सांगितली `ती` वाईट आठवण
koffee with karan season 7 : निर्माता दिग्दर्शक (Karan Johar) करण जोहरच्या टॉक शो koffee with karan season 7 ला चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो. आतापर्यंत या शोमध्ये सध्याच्या घडीला चर्चेत असणाऱ्या बऱ्याच सेलिब्रिटींनी हजेरी लावली. असंख्य गौप्यस्फोट झाले, असंख्य (Relationships) रिलेशनशिप्स आणि ब्रेकअपवरून पडदाही उठला. याच कार्यक्रमात येत आला कपूर कुटुंबाची हलाखीची परिस्थितीही सर्वांसमोर आली आहे.
वाचून विश्वास बसणार नाही, कारण कपूर कुटुंबाला कधी आर्थिक चणचण भासू शकते यावर तुमचा विश्वासच बसणार नाही. पण, हेच वास्तव आहे. ते म्हणतात ना, सत्य नेहमी कटू असतं... मग हेच ते सत्य आहे असं समजा.
'कॉफी विथ करण'च्या नव्या भागासाठी नुकतीच (Shah rukh khan) शाहरुख खान याची पत्नी गौरी खान (Gauri khan) तिच्या दोन खास मैत्रिणींसोबत आली होती. या मैत्रिणी होत्या (Maheep Kapoor) महीप कपूर (संजय कपूरची पत्नी) आणि (Bhavana pandey) भावना पांडे (चंकी पांडेची पत्नी).
गप्पांच्या ओघात याच कार्यक्रमात महीपनं आपल्या कुटुंबावर ओढावलेल्या आर्थिक संकटावर वक्तव्य केलं. एका सेलिब्रिटी कुटुंबातील सदस्य असल्यामुळं आपल्याला आणि कुटुंबाला कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागलं होतं, याचाही खुलासा महीपनं केला. (Bollywood Actor Sanjay Kapoor wife maheep on bad patch where they faced financial crisis)
'अशीही वेळ आली होती, जेव्हा संजयकडे काहीच काम नव्हतं आणि तो असाच घरात बसून होता. तेव्हा पैशांची प्रचंड अडचण होती. माधी मुलं ग्लॅमर आणि हा झगमगाट पाहून मोठे झाले आहेत. पण, एका मोठ्या सेलिब्रिटी कुटुंबातील एक भाग असूनही आमच्यासाठी मात्र आयुष्य सोपं नव्हतं. इतकंच काय, तर आजुबाजूच्या अनेकांनीच मला कायम आपण कपूर कुटुंबाची अपयशी फळी असल्याचं दाखवून देत हिणवलं...', असं महीपनं सांगितलं.
आर्थिक अडचणी येतात तेव्हा सर्वसामान्य माणसंही खचतात, तिथे सततची प्रसिद्धी आणि माध्यमांच्या नजरा असणाऱ्या या सेलिब्रिटी कुटुंबीयांची काय अवस्था असेल, याचा विचार केला तरी डोकं चक्रावून जात आहे.
परिस्थिती सतत बदलत असते, तसंच दिवस बदलले आणि हळुहळू हे कुटुंब त्यांच्या संकटांवर मात करुन पुन्हा नव्यानं उभं राहिलं आणि नव्यानं आयुष्य जगण्यास सुरुवात केली. संकटं आली नाहीत असं नाही, पण त्यांना तोंड कसं द्यायचं हे महीप आणि संजयला चांगलंच उमगलं होतं. परिस्थिती काहीही असो आपल्या माणसांची साथ आणि विश्वास सगळ्यातून तारून नेतो हेच या सेलिब्रिटी जोडीच्या अनुभवातून इतरांनीही शिकावं.