मुंबई : कलाकाराच्या वाट्याला प्रसिद्धी आल्यानंतर त्याच्या प्रसिद्धीमध्ये आणि यशामध्ये अडथळा येणं तसं कठीण. एकदा का लोकांच्या नजरेत एखादा कलाकार बसला, की तो पुढे जाऊन यशस्वी ठरलाच म्हणून समजा. ही झाली नाण्याची एक बाजू, पण याच कलाकाराचं आयुष्य कमी असेल तर? नाण्याची दुसरी बाजू नकोशी असली, तरीही ती नाकारता येणारी नाही. (Bollywood actor Sanjeev Kumar Birth Anniversary family details biography death)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नियतीचा खेळ कुणालाही कळला नाही, त्यालाच बळी पडला एक अतिशय लोकप्रिय अभिनेता. दमदार पात्र साकारत प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या या अभिनेत्याचं नाव संजीव कपूर. 


हिंदी चित्रपटसृष्टीत 70 - 80 चं दशक गाजवणाऱ्या या कलाकारानं चित्रपट जगतामध्ये स्वत:चं भक्कम स्थान निर्माण केलं. प्रवास खूप मोठा होता, खूप काही मिळवायचं होतं पण या अभिनेत्याला आयुष्यानं साथ नाही दिली ही शोकांतिका. 


पहिल्या चित्रपटातील त्यांची भूमिका अतिशय छोटेखानी होती. पण, सुरुवात केल्यानंतर मात्र त्यांनी पुन्हा मागे वळून पाहिलं नाही. त्यांनी 'शोले' या चित्रपटामध्ये साकारलेला 'ठाकूर' कोण विसरेल? 


'दस्तक', 'खिलौना', 'सीता और गीता', 'कोशिश' या चित्रपटांतून त्यांनी आपल्या अभिनयाची जादू प्रेक्षकांना दाखवून दिली. मुंबईमध्ये त्यांना अनेकजण हरी या नावानं ओळखत होते. हरिहर जेठालाल जरिवाला असं त्यांचं खरं नाव.  


कमी निर्मीती खर्च असणाऱ्या पण, पटकथेमध्ये ताकद असणाऱ्या या अभिनेत्यानं कधीच या चित्रपटांसाठी मानधन घेतलं नाही असं म्हणतात. हो, पण हा अभिनेता त्यात आपलं योगदान देण्यास कुठेच कमी पडला नाही, हेसुद्धा तितकंच खरं. 



एका मुलाखतीमध्ये संजीव कुमार यांनी जरीवाला कुटुंबातील कोणीही पुरुष सदस्य वयाची पन्नाशी पूर्ण करत नाही, त्याआधीच त्यांचं निधन होतं असं सांगितलं होतं. याच एका कारणामुळे संजीव कुमार अविवाहित राहिले. 


हेमा मालिनी यांच्यावर त्यांचं एकतर्फी प्रेम होतं, याचीही बरीच चर्चा त्या काळात झाली होती. पण, हेमा मालिनी मात्र धर्मेंद्र यांच्यावर प्रेम करत होत्या. वयाच्या 47 व्या वर्षी संजीव कुमार यांनी जगाचा निरोप घेतला आणि तेव्हाच त्यांनी मुलाखतीत उल्लेख केलेल्या 'त्या' नकोशा गोष्टीची आठवण अनेकांना झाली.