मुंबई : शनिवारी एका नव्या उपक्रमाच्या निमित्ताने खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका समारंभाचं आयोजन केलं होतं. या समारंभात छोट्या पडद्यासोबतच बॉलिवूडमधीलही काही सेलिब्रिटींची उपस्थिती पाहायला मिळाली होती. चेंज विथीन असा हा उपक्रम आहे, ज्याविषयीच्या कार्यक्रमात शाहरुख खान, आमिर खान, करण जोहर, कंगना राणौत, एकता कपूर, इम्तियाज अली, अनुराग बासू, बोनी कपूर यांची उपस्थिती पाहायला मिळाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वीच पार पडेलल्या महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंती वर्षाला विशेष संस्मरणीय करण्यासाठी या समारंभाची आखणी करण्यात आली होती. या खास कार्यक्रमाच्या निमित्ताने कलाविश्वातील बऱ्याच सेलिब्रिटींसोबत मोदींनी संवाद साधत काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चाही केली. 


चित्रपटांचं विश्वविद्यालय ही संकल्पना किती फायद्याची आहे, ही बाब अधोरेखित करत आम्ही कलाकार महात्मा गांधी यांचा संदेश सर्वत्र पोहोचवण्यासाठी कशा प्रकारे आपली भूमिका बजावू शकतो याविषयीची चर्चा या सत्रात झाली, असं ट्विट करत किंग खान म्हणजेच अभिनेता शाहरुख खान याने मोदींसोबतचा एक फोटो पोस्ट केला. 




महात्मा गांधीजींचे विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठीच्या मोदींच्या प्रयत्नांची प्रशंसा करत परफेक्शनिस्ट आमिर खाननेही त्याचं मत मांडलं. एक कलाकार म्हणून आपण, खूप काही करु शकतो ही बाब स्पष्ट करत पंतप्रधानांना त्याने आपल्या योगदानाविषयी आश्वस्त केलं.





कलाकारांच्या उपस्थितीत पार पडलेल्या आणि सोशल मीडियावरही बऱ्याच चर्चेत असणाऱ्या या कार्यक्रमात पंतप्रधानांनी गांधीजींच्या विचारांचं महत्त्वं स्पष्ट केलं. रुपेरी पडद्यासोबत छोट्या पडद्याच्या माध्यमातूनही गांधीजींचे विचार मांडले जात असल्याबद्दल त्यांनी प्रशंसा केली.