अवघ्या सहाव्या वर्षी शाहरुखच्या मुलाची कमाल; वाचून तुम्हीही म्हणाल...
पाहा त्याने असं केलं तरी काय....
मुंबई : अभिनेता शाहरुख खान चित्रपट, जाहिराती आणि विविध कार्यक्रमांमध्ये कितीही व्यग्र असला तरीही त्याच्या कुटुंबालाही तो वेळोवेळी प्राधान्य देतो. पत्नीला वेळ देणं असो किंवा मग मुलांच्या शालेय कार्यक्रमांना हजेरी लावणं असो. शाहरुख एक पती आणि पिता म्हणून कायमच त्याची जबाबदारी पार पाडतो. असा हा किंग खान सध्या त्याच्या सर्वात लहान मुलामुळे प्रकाशझोतात आला आहे.
किंग खानच्या लेकाने अशी काही किमया केली आहे, की खुद्द शाहरुखनेही आपल्याला त्याचा प्रचंड अभिमान असल्याचं स्पष्ट केलं. आपल्या बहीण आणि मोठ्या भावाच्या पावलावर पाऊल ठेवत शाहरुख खानच्या धाकट्या मुलाने म्हणजेच अब्रामने तायक्वांडो या खेळात घवघवीत यश संपादन केलं आहे.
रविवारी किंग खानने सोशल मीडियावर त्याच्या मुलाची काही छायाचित्र शेअर केली. ज्यामध्ये अब्राम तायक्वांडोच्या वेशात आणि या खेळात मग्न दिसला. यातील एका छायाचित्रामध्ये अब्रामच्या गळ्यात सुवर्णपदकही दिसत आहे. थोडक्यात काय, तर वडील कलाविश्वात प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असतानाच शाहरुखच्या मुलाने क्रीडा विश्वात त्याची एक वेगळी ओळख प्रस्थापित केली आहे. तेसुद्धा वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी.
पाहा : Oscarsच्या रेड कार्पेटवर 'फॅशन का है ये जलवा'....
अब्राम फक्त तायक्वांडोमध्येच यश संपादन करत आहे, असं तुम्हाला वाटत असेल तर तसं नाहीये. शालेय क्रीडा स्पर्धा, सांस्कृतीक कार्यक्रम आणि अभ्यासाही तो कायम पुढे असतो. शाहरुखने आजवर त्याच्या अनेक सोशल मीडिया पोस्टमधून फक्त अब्रामच नव्हे, तर सुहाना आणि आर्यन यांच्याही यशाबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. एक अभिनेता म्हणून शाहरुखला आपल्या कारकिर्दीचा जितका अभिमान असेल किंबहुना त्याहून जास्त अभिमान त्याला एक पिता म्हणून वाटत असेल यात शंका नाही.