...तर शाहरुख खानचा 21 वर्षांपूर्वीचा `हा` ब्लॉकबस्टर चित्रपट सलमान खानला मिळाला असता
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने त्याच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. 21 वर्षांपूर्वी त्याने एक ब्लॉकबस्टर चित्रपट केला होता, जो सलमान खानला मिळाला असता.
Shah Rukh Khan : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि सलमान खान यांची मैत्री खूपच जुनी आहे. दोघे नेहमीच एकमेकांच्या बाजूने उभे राहतात. शाहरुख खानने त्याच्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ज्यामध्ये अनेक चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले आहेत. सध्या शाहरुख खानकडे प्रत्येकी 1000 कोटीचे दोन चित्रपट आहेत. शाहरुख खानचा 21 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान शाहरुख खान जखमी झाला होता. त्यावेळी शाहरुख खानने त्याच्या निर्मात्यांना सलमान खानला कास्ट करण्याचे सुचवले होते.
या चित्रपटाचे नाव 'कल हो ना हो' आहे. हा चित्रपट निखिल अडवाणीने दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाच्या वेळीचा किस्सा त्यांनी मिर्ची प्लसशी शेअर केला आहे. अलीकडेच 'कल हो ना हो' हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. निखिल अडवाणीने या चित्रपटाचे लेखन आणि समर्थन करणाऱ्या करण जोहरला फोन करून शाहरुख खानने हा चित्रपट न करण्याचा इरादा कसा व्यक्त केला हे सांगितले.
21 वर्षांपूर्वी शाहरुखने घेतला होता हा निर्णय
'कल हो ना हो' चित्रपटाच्या निर्मात्यांनी सांगितले की, शाहरुख खान चित्रपटातील लोकप्रिय डायरी सीन शूट करत होता. परंतु, तो वेगळ्या पद्धतीने चित्रित करण्यात आला होता. जो नंतर काढून टाकण्यात आला आणि त्यानंतर तो रेल्वे स्थानकावर पुन्हा चित्रित करण्यात आला. ज्यामध्ये एक सीन शूट केल्यानंतर शाहरुख खानला समजले की तो शूटिंग सुरू ठेवू शकणार नाही आणि त्याला त्वरित वैद्यकीय मदतीची आवश्यकता आहे. निखिल म्हणाला, 'एक सीन केल्यानंतर त्याने आम्हाला कॉल केला आणि सांगितले की माझ्यासाठी हे शक्य होणार नाही, तुम्ही लोक एक काम करा. मी सलमानला फोन करेन, सलमानसोबत हा सीन करा'.
कारण शाहरुख खानची पाठीची दुखापत वाढल्याने हा मोठा निर्णय त्याने घेतला होता. त्यानंतर शाहरुख खानने तातडीने जर्मनीला जाऊन शस्त्रक्रिया केली. पाठीच्या दुखापतीतून सावरण्यासाठी शाहरुख खानला 6 महिन्यांची विश्रांती घेण्यास सांगण्यात आले होते. अशा परिस्थितीत निर्माते थांबणार नाहीत, असे शाहरुख खानला वाटले. पण जेव्हा निखिल आणि करण जोहरने ठरवलं की शाहरुख खान जोपर्यंत ठीक होत नाही तोपर्यंत ते चित्रपटाचे शूटिंग थांबवतील.