मुंबई : अभिनेता शाहरुख खान हा सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहेत. पण, त्यासोबतच तो आणखी एका कारणामुळे प्रकाशझोतात येता आहे. ते म्हणजे त्याच्या ट्विटमुळे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूडचा हा किंग सध्या एका दुसऱ्याच महाराजाचे आभार मानत आहे. आता थेट किंग खान आभार मानत असणारे हे राजेसाहेब आहेत तरी कोण, असाच प्रश्न तुमच्याही मनात घर करत आहे ना? 


शाहरुख आभार मानत असणारे हे महाराज आहेत, 'एअर इंडिया' नावाच्या संस्थानाचे. 


अर्थात एअर इंडियाच्या विमान प्रवासादरम्यान आपल्याला पुरवण्यात आलेल्या सेवेने प्रभावित होत शाहरुखने एक ट्विट केलं आणि त्या माध्यमातून महाराजाचे म्हणजेच एअर इंडियाचे आभार मानले आहेत. 


मुख्य म्हणजे त्याने स्वत:च ब्रँड अँबेसेडर म्हणून स्वत:च्या नावाची घोषणा करत, 'महाराजा महाराजा होता है...' असंही म्हटलं आहे. 


शाहरुखच्या या ट्विटला उत्तर देत एअर इंडियाकडूनही त्याच शैलीत आणखी एक ट्विट करण्यात आलं. 'किंग खानला सेवा पुरवण्यात महाराजाला नेहमीच आनंद होतो', असं म्हणत एअर इंडियाकडूनही शाहरुखच्या या शब्दांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. 



दरम्यान,  हवाई प्रवास करणाऱ्यासाठी गेल्या काही वर्षांमध्ये ही सेवा पुरवणाऱ्या बऱ्याच कंपन्या उदयास आल्या आणि या व्यवस्यात स्थिरावल्या. या साऱ्या स्पर्धेच्या वातावरणात एअर इंडियानेही आपलं स्थान कायम ठेवलं आहे. 


अर्थात यात त्यांच्यासमोर काही अडथळेही आले. पण, त्यावरही त्यांनी मात करत प्रवाशांना चांगल्या सोयींसह प्रवासाचा अनुभव देण्याचं काम सुरु ठेवलं आहे, हे नाकारता येणार नाही.