मुंबई : बॉलिवूड अभिनेते, अभिनेत्री नेहमीच प्रसिद्ध आणि फिट अभिनेत्रींच्या प्रेमात पडत असतात, अथवा त्यांच्याशी लग्न करतात. त्यामुळे ते कपल नेहमीच चर्चेत राहतात. अशाच एका बॉलिवूड कपल बद्दल तुम्हाला सांगणार आहोत. बॉलिवूड अभिनेत्याची बायको अभिनेत्री नसून सुद्धा खुपच बोल्ड आहे. तिचे फोटो आणि लुक पाहून ती आघाडीच्या अभिनेत्रींनाही मागे सोडेल. त्यामुळे हे कपल कोणत आहे ते जाणून घेऊयात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त आणि मान्यता दत्त या कपल बद्दल आपण बोलत होतो. बॉलिवूड मधलं हे खूपच फेमस कपल आहे. तसेच संजय दत्तची बायको मान्यता दत्त मोठी अभिनेत्री नसली तरी ती नेहमीच तिच्या लुक्स आणि स्टाईलमुळे चर्चेत असते.  



मान्यता दत्त 22 जुलैला तिचा 44 वा वाढदिवस साजरा करणार आहे. ती जरी 44 वयात प्रवेश करणार असली तरी तिला पाहून तुम्हाला धक्काचं बसेल. कारण ती स्वत;ला इतकं फिट ठेवते की तिची वय खरंच इतकं यावर तुम्हाला विश्वास बसणार नाही.  


फिटनेसवर देते खास लक्ष 
मान्यता दत्त सोशल मीडियावर खुप अॅक्टिव्ह असते. तिचे इंस्टाग्राम अकाऊंट तिच्या फोटो आणि वर्कआउट व्हिडिओंनी भरलेले आहे. तसेच मान्यताचे वर्कआउट व्हिडिओ पाहून तिच्या फिटनेसचा मंत्र तुम्हाला कळत असेल. मान्यता दररोज वेगवेगळे व्यायाम करण्यावर विश्वास ठेवते. विविध प्रकारचे व्यायाम केल्याने शरीर प्रत्येक प्रकारे क्रियाशील राहते, असा तिचा विश्वास आहे. 



डाएटवर देते लक्ष
हेवी वर्कआउट्स व्यतिरिक्त, मान्यता चांगल्या आहाराकडेही लक्ष देते. म्हणजेच कोणत्याही प्रकारे ती तिच्या फिटनेसबाबत कोणतीही निष्काळजीपणा घेत नाही. त्यामुळे आज 43 व्या वयातही ती इतकी फिट आहे.  



दरम्यान मान्यता आणि संजय दत्त यांचा विवाह ७ फेब्रुवारी २००८ रोजी झाला होता. लग्नानंतर दोघेही एक मुलगा आणि मुलीचे पालक झाले. मान्यता-संजय दत्त यांच्या मुलाचे नाव शहरान आणि मुलीचे नाव इकरा आहे.