शत्रुघ्न सिन्हा यांचे `या` अभिनेत्रीसोबत अफेअर, बायकोनं रंगेहात पकडताच...
शत्रुघ्न सिन्हा निवडणुकीत पराभूत झाले असले, तरी पक्षातील त्यांचे स्थान काळाबरोबर खास बनले.
मुंबई : आज शत्रुघ्न सिन्हा यांचा वाढदिवस आहे. ते आज त्यांचा 76 वा वाढदिवस साजरा करत आहेत. शत्रुघ्न हे 80 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यांचा राजकीय प्रवास 1992 मध्येच सुरू झाला. जेव्हा ते नवी दिल्लीतून काँग्रेसचे राजेश खन्ना यांच्या विरोधात उभे होते. शत्रुघ्न सिन्हा निवडणुकीत पराभूत झाले असले, तरी पक्षातील त्यांचे स्थान काळाबरोबर खास बनले.
आपल्या दमदार अभिनयासाठी आणि डायलॉग डिलिव्हरीसाठी ओळखले जाणारे शत्रुघ्न सिन्हा यांनी प्रत्येकाच्या हृदयात आपली जागा निर्माण केली आहे. पण तुम्हाला माहित आहे, का की शत्रुघ्न एकेकाळी प्रसिद्ध अभिनेत्री रीना रॉयच्या प्रेमात पडले होते.
रीना रॉयच्या लग्नाची बातमी ऐकून शत्रुघ्न खूप रडले
शत्रुघ्न सिन्हा यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलायचे तर, 2016 साली प्रकाशित झालेल्या 'एनिथिंग बट खामोश' या पुस्तकात रीना रॉय आणि शत्रुघ्नच्या नात्याबद्दल अनेक गोष्टी लिहिल्या गेल्या आहेत. शत्रुघ्न सिन्हा यांच्या जीवनावर आधारित या पुस्तकाच्या लेखिका भारती एस प्रधान यांनीही रीना रॉयच्या लग्नाची बातमी ऐकून शत्रुघ्न सिन्हा लहान मुलासारखे रडल्याची घटना खरी असल्याचे सांगितले आहे.
एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, रीनासोबत त्यांचे नाते 7 वर्षे टिकले. लग्नाच्या अनेक वर्षानंतरही ते रीना रॉयला भेटत राहिले. त्यांच्या जीवनावर आधारित 'एनिथिंग बट खामोश' या पुस्तकातही याचा उल्लेख आहे. एका कार्यक्रमादरम्यान शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितले होते की, रीना रॉयसह त्यांची पत्नी पूनम यांनी त्यांना दोनदा रंगेहात पकडले आहे.
काय म्हणाले शत्रुघ्न?
शत्रुघ्न यांनी सांगितले की, जेव्हा ते पहिल्यांदा पकडले गेले तेव्हा त्यांची पत्नी पूनम यांनी त्यांना चेतावणी देऊन सोडून दिले होते, परंतु तरी देखील आपल्या पत्नीच्या या चेतावणीला न जुमानता त्यांनी अपलं अफेअर सुरू ठेवलं. त्यांना दुसऱ्यांदा त्यांच्या पत्नीने त्यांना फसवणूक करताना पकडले, तेव्हा त्यांच्या पत्नीने त्यांना आपल्या मुलांचा विचार करण्यास सांगितले.
त्या दिवसानंतर ते पूर्णपणे बदलले आणि त्यांनी या सगळ्या गोष्टी आपल्या मनातून काढून टाकल्या. शत्रुघ्न सिन्हा यांना सोनाक्षी, लव आणि कुश सिन्हा अशी तीन मुले आहेत.
शत्रुघ्न यांनी एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, "रीनाशी माझे नाते वैयक्तिक आहे. लोक म्हणतात की, लग्नानंतर रीनाबद्दलच्या माझ्या भावना बदलल्या. पण प्रत्यक्षात त्यात वाढ झाली होती. मी भाग्यवान आहे की, रीनाने मला तिच्या आयुष्यातील सात वर्षे दिली."
मिलापच्या सेटवर दोघांची भेट झाली होती. दोघांनाही एकमेकांशी लग्न करायचे होते पण हे नाते पुढे गेले नाही.
रीना रॉय आणि शत्रुघ्न सिन्हा ही त्या काळातील सर्वात हिट जोडी होती. या दोघांनी मिळून 16 चित्रपट एकत्र केले, ज्यापैकी 11 सुपरहिट ठरले. पुढे रीना रॉय यांनी कारकिर्दीच्या शिखरावर असतानाही पाकिस्तानचा प्रसिद्ध क्रिकेटर मोहसिन खानशी लग्न केलं.