बॉलिवूड दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची वेब सीरिज 'हिरामंडी'मुळे अभिनेता शेखर सुमन आणि त्याचा मुलगा अध्यय़न सुमन सध्या चर्चेत आहे. हिरामंडीमधील त्यांच्या कामाला प्रेक्षकांनी पसंती दिली आहे. समीक्षकांनीही त्यांच्या अभिनयाला दाद दिली आहे. 'हिरामंडी'मुळे अज्ञातवासात गेलेल्या अध्ययन सुमनला दुसरी संधी मिळाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अध्ययन सुमनने प्रमुख हिरो म्हणून आपल्या बॉलिवूड करिअरला सुरुवात केली होती. पण वेळेसोबत कशाप्रकारे वेळेसोबत पोस्टवरील त्याचा फोटो इतरांच्या तुलनेत छोटा होऊ लागला याबद्दल त्याने सांगितलं आहे. हे पाहिल्यानंतर कशाप्रकारे आपल्या वेदना व्हायच्या यावरही त्याने भाष्य केलं आहे. अध्ययनचं हे म्हणणं ऐकल्यानंतर शेखर सुमनने मुलाला कतरिना कैफकडून शिकण्याचा सल्ला दिला. तसंच तिचं तोंडभरुन कौतुक केलं. 


बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत अध्ययन सुमनने सांगितलं की, "मी करिअरच्या सुरुवातीला आपल्या सर्व चित्रपटांचा हिरो होतो. पण नंतर पोस्टरमधील साईज छोटी होत गेली. यामुळे किती वाईट वाटतं याची मला जाणीव आहे. आता पुन्हा एकदा ते सर्व परत आणण्याची लढाई आहे. हा सगळा त्याचा प्रवास आहे".


शेखर सुमनने केलं कतरिनाचं कौतुक


अध्ययन सुमनच्या विधानावर व्यक्त होताना शेखर सुमनने त्याला इतरांच्या प्रवासावरुन शिकण्याचा सल्ला दिला. तो म्हणाला की, "कतरिन कैफला पाहा. जेव्हा बूम चित्रपट आला होता तेव्हा तिला उभंही राहता येत नव्हतं. तिला आपले डायलॉग बोलणं, डान्स करणंही येत नव्हतं. पण आज ती कुठे पोहोचली आहे पाहा. 'राजनीती', 'जिंदगी ना मिलेगा दोबारा' मधील तिचं काम पाहा. धूम 3 मधीलही तिचं काम पाहा. तुम्ही तिला पाहिल्यानंतर ही तीच मुलगी आहे असं म्हणूच शकणार नाही".


यावेळी त्याने दिपिका पदुकोण आणि अनन्या पांडेचंही कौतुक केलं. "दीपिका पदुकोणही किती सुंदर अभिनेत्री झाली आहे. 'खो गए हम कहाँ' च्या आधी अनन्य पांडेला किती ट्रोलिंगचा सामना करावा लागला. तुम्हाला थोडा आत्मसन्मान आणि सेन्स ऑफ ह्यूमरने हे सहन करावं लागतं," असं शेखर सुमनने सांगितलं.