गेहराईया (Gehraiyaan) चित्रपटात सिद्धार्थ चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) आणि दीपिका पदुकोन (Deepika Padukone) यांनी बोल्ड सीन दिल्याची चांगलीच चर्चा होती. दरम्यान या बोल्ड सीन्समुळेच आपण जवळपास चित्रपटातून माघार घेतली होती असा खुलासा त्याने नुकताच केला आहे. शकुन बत्रा दिग्दर्शित गेरहाईया चित्रपटात नातेसंबंध, फसवणूक आणि महत्वाकांक्षा या गुंतागुंतीच्या गोष्टी उलगडतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत सिद्धार्थने सांगितलं की, दीपिकासह इंटिमेट सीन शूट करताना तो फार घाबरला होता. परिस्थिती इतकी तणावपूर्वक झाली होती की, त्याचे वडील आणि निर्माता करण जोहर यांना पुढाकार घ्यावा लागला होता असा खुलासा त्याने केला. सिद्धार्थने यावेळी वडिलांसह झालेल्या संवादाचीही माहिती दिली ज्यात त्यांनी त्याला यावर मात करण्याचा सल्ला दिला होता. त्याचे वडील म्हणाले की, "ऐक, देशातील 99 टक्के लोक ही संधी मिळावी यासाठी काहीही करतील. ते यासाठी एका सेकंदाचाही विचार करणार नाहीत. तू नेमका काय विचार करत आहेस? थोडा प्रोफेशनल वाग, हे तुझं काम आहे".


सिद्धार्थने यावेळी वडिलांनी आपल्याला तुझ्याकडे नेमकी कोणती संधी आहे याची आठवण करुन दिल्याचं सांगितलं. ते म्हणाले की, "याने काही फरक पडत नाही. तूच आहेस जो गोष्टींच्या व्याख्या ठरवणार आहेस. जर तुला अभिनेता व्हायचं असेल तर जा आणि हे कर. जोपर्यंत तू नव्याने व्याख्या आखत नाहीस तोपर्यंत काही करु शकणार नाहीस. सिद्धार्थ हा धर्माचा चित्रपट आहे, दीपिका, शकुन बत्रा आहेत आणि तुला तुझं काम करायचं आहे".


याच मुलाखतीत सिद्धार्थने त्याच्या नातेवाईकांची यावर काय प्रतिक्रिया होती याबद्दलही सांगितलं. "माझे सर्व नातेवाईक आश्चर्यचकित झाले होते. त्यांना काय बोलावं सुचत नव्हतं. त्याचं असं झालं होतं की, आम्हाला वाटलं तू अभिनेता झाला आहेस, पण आता हे अती झालं आहे. तो आमचं स्वप्न जगत आहे. ते याशिवाय काय बोलू किंवा करु शकत होते? माझा मामा तर नुसता लाजत होता आणि माझ्याकडे पाहत होता. मी त्याला सांगत होतो आधी चित्रपट बध आणि तो कशावर आहे ते समजून घे. पण त्यांचंलक्ष इंटिमेट सीनवर होतं आणि हसत होते," असं सिद्धार्थ म्हणाला.


चित्रपटात सिद्धांतने झैनची भूमिका साकारली होती. अनन्या पांडे आणि दीपिका पदुकोण यांच्यासोबत एका जटिल प्रेम त्रिकोणात अडकलेलं पात्र त्याने साकारलं होतं. हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला होता.