Siddharth Malhotra on His First Salary: शेरशहा या चित्रपटातून प्रेक्षकांच्या नजरेत चमकलेला अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Actor Siddharth Malhotra) पुन्हा चर्चेत आला आहे. मध्यंतरी कियार अडवाणीसोबतच्या रिलेशपशिपमुळे चर्चेत आला होता. सिद्धार्थ मल्होत्रा ​​याने बॉलिवूडमध्ये आपले खास स्थान निर्माण केले आहे. 10 वर्षांहून अधिक काळ तो चित्रपटातून काम करत आहे. मात्र, सिद्धार्थ मल्होत्रा ​​त्यानंतरही स्टारडमसाठी तळमळत होता. पण शेरशहा या चित्रपटानंतर त्याच्या कारकिर्दीला नवी उंची मिळाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकत्याच एका मुलाखतीत सिद्धार्थ मल्होत्रानं आपल्या पहिल्या वहिल्या कमाईबद्दल खुलासा केला आहे. त्या मुलाखतीत त्यानं सांगितलं की, चित्रपटसृष्टीशी माझा दूरदूरपर्यंत संबंध नव्हता. परंतु आपली स्वप्नं पुर्ण करण्यासाठी मी कधीच मागे वळून पाहिलं नाही.


2012 मध्ये त्याने 'स्टुडंट ऑफ द इयर' (Student Of the Year) चित्रपटातून पदार्पण केले होतं पण त्यापुर्वी सिद्धार्थ चित्रपटसृष्टीत स्ट्रगल करत होता.त्याचा पहिला पगार 7,000 रुपये होता, जो त्याने त्याच्या आईला दिला होता. याबद्दल बोलताना तो म्हणाला की, 'मला पहिल्यांदा 7,000 रुपये मिळाले होते आणि मी हे पैसे माझ्या आईला दिले, जेव्हा मला माझा पहिला पगार मिळाला तेव्हा माझे बँक खातेही नव्हते. एवढ्या मोठ्या सेटवर पहिल्यांदा येणं माझ्यासाठी खूप कठीण होतं असं मला वाटतं. असं त्यानं सांगितले. 


आणखी वाचा  - 'हर हर महादेव' चित्रपटातील भुमिकेबद्दल अभिनेता सुबोध भावेचा मोठा निर्णय


त्याचवेळी सिद्धार्थने खुलासा केला की 'स्टुडंट ऑफ द इयर' हा त्याचा पहिला चित्रपट नव्हता. सिद्धार्थ म्हणाला की, त्याचा पहिला दिग्दर्शक करण जोहर नसून अनुभव सिन्हा होते. वास्तविक सिद्धार्थ मल्होत्राने वर्षापूर्वी अनुभव सिन्हा यांच्या एका चित्रपटासाठी ऑडिशन दिली होती. सिद्धार्थ मल्होत्रासोबत आणखी दोन कलाकार या चित्रपटातून लॉन्च होणार होते, पण नंतर हा चित्रपट पुर्ण होऊ शकला नाही.


सिद्धार्थ लवकरच 'थँक गॉड' (Thank God) चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अजय देवगणही दिसणार आहे. नुकतेच या चित्रपटातील 'माणिक' हे गाणे रिलीज करण्यात आले आहे, ज्यामध्ये सिद्धार्थ मल्होत्रासोबत नोरा फतेही दिसत आहे. हे गाणे प्रेक्षकांना खूप आवडते.