Sonam Kapoor Baby Shower: बॉलिवूडची फॅशनिस्ता अशी ओळख असणाऱ्या अभिनेत्री सोनम कपूरला मातृत्त्वाची चाहूल लागल्या क्षणापासून तिच्यासाठी येणारा प्रत्येक दिवस काहीतरी नवा अनुभव आणताना दिसत आहे. गरोदरपणातील फोटोशूट असो किंवा मग बेबीमूनच्या निमित्तानं एका सुरेख ठिकाणी फिरण्यासाठी जाणं असो. (Bollywood Actor Sonam Kapoor baby shower musician leo kalyan grabs)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोनमला या दिवसांमध्ये शक्य त्या सर्व परिंनी आनंद देण्यासाठी तिचा पती आनंद अहूजासुद्धा कुठंच मागे पडत नाही. आतासुद्धा तिच्या बेबी शॉवरची बरीच चर्चा सुरु आहे. 


सोनमचं बेबी शॉवर म्हटलं की, त्याची थिम, तिचं आऊटफिट, पार्टीचा मेन्यू या सर्व गोष्टी प्रचंड लक्ष वेधून गेल्या. पण, त्याचवेळी पाहुण्यांमध्ये आलेल्या एका व्यक्तीनं नेटकऱ्यांच्या नजरा वारंवार वळवल्या. 


वन पिस, साजेशी ज्वेलरी, तसाच काहीसा मेकअप अशा रुपात एक व्यक्ती सोनमच्या बेबी शॉवरमध्ये नजरा वळवत होता.  हे फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध होताच एका पुरुषाला या रुपात पाहून पाहणाऱ्यांनाही धक्का बसला. 


सोनमसोबत दिसणारा हा व्यक्ती कोण? हाच प्रश्न यानंतर अनेकांनी विचारण्यास सुरुवात केली आणि अखेर त्या व्यक्तीचं नाव समोर आलं. सोनमच्या लंडनच्या घरी पार पडलेल्या या सोहळ्यातील चर्चेत आलेला व्यक्ती म्हणजे म्युझिशियन लिओ कल्याण. 


लिओनं सोनमसाठी या कार्यक्रमामध्य़े आपल्या कलेचा नजराणाही सादर केला. पण, त्याच्या कलेला दाद मिळण्याहून जास्त त्याच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली. लिओचा हा लूक बहुतांश नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला नाही. 




'हा कुठला फॅशन सेन्स?' असेच प्रशन करत अनेकांनीच त्यांना धारेवर धरलं. दरम्यान, या बेबी शॉवरसाठी सोनमनं एका सुरेख लूझ आऊटफिटला पसंती दिली होती. डार्क लिपस्टीक आणि मिनीमल मेकअप असा तिचा एकंदर लूक यावेळी पाहायला मिळाला होता.