मुंबई : जवळपास तीसहून अधिकजणांच्या चौकशीनंतर आणि घटनास्थळाची पाहणी, पडताळणी आणि अभ्यासपूर्ण चौकशी केल्यानंतर आता अभिनेता SUSHAN SINGH RAJPUT सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणी सुरु असणाऱ्या चौकशीच्या अंतिम टप्प्यावर मुंबई पोलीस पोहोचल्याची चिन्हं आहेत. 'झी न्यूज हिंदी'च्या वृत्तानुसार शनिवारी या प्रकरणाशी संबंधित अधिकाऱ्यांनी फॉरेन्सिक टीमची भेट घेतली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांशी संलग्न सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या १०-१५ दिवसांमध्ये फॉरेन्सिक विभागाचा अहवाल मुंबई पोलिसांना सोपवण्यात येईल. गरज भासल्यास आणखीचही काही उर्वरित व्यक्तींचा या प्रकरणी जबाब नोंदवला जाऊ शकतो. ज्यांना यादरम्यानच्याच काळात पोलीस स्थानकातून बोलावणं येईल. 


म्यान मुंबई पोलीस आणि फॉरेन्सिक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीतून कोणत्याही प्रकारची धक्कादायक माहिती समोर आलेली नाही. पण, तरीही आता अखेरच्या अहवालाकडेच सर्वांच्या नजरा लागलेल्या असतील. काही दिवसांपूर्वीच सुशांतच्या आत्महत्याप्रकरणी पोलिसांनी सलमान खानकडे एकेकाळी मॅनेजर म्हणून काम पाहणाऱ्या रेश्मा शेट्टीचीही चौकशी केली. जवळपास पाच तासांसाठी: तिची चौकशी केल्याचं म्हटलं जात आहे. सलमान खानकडे काम करणं बंद केल्यानंतर रेश्मानं तिची स्वत:ची वेगळी अशी टॅलेंट मॅनेजमेंट कंपनीही सुरु केली होती. आपण सुशांतला आतापर्यंत फक्त दोन वेळाच भेटल्याची माहिती या चौकशीदरम्यान तिनं दिल्याचं कळत आहे. 


 


साधारण महिन्याभरापूर्वी अभिनेता सुशांत सिंह राजपूत यानं त्याच्या मुंबईतील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. सुशांतनं नैराश्यामुळं अतामहत्येचं पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे. असं असलं तरीही त्याच्या आत्महत्येमुळं काही महत्त्वाच्या अनुत्तरित प्रश्नांनी डोकं वर काढलं आहे. ज्यामुळं त्यामागचं गूढ उकल्यासाठीच अनेकांनी आग्रही सूर आळवला आहे.