मुंबई : अभिनेता विकी कौशल याच्याशी मागील काही दिवसांपासून कतरिना कैफचं नाव जोडलं जात होतं. अनेक ठिकाणी तर त्यांच्या साखरपुड्याच्या चर्चांनीही जोर धरला. पण, आता मात्र बॉलिवूडमद्ये भलतंच काही घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे भलतंच कारण, विकी आता अभिनेत्री सारा अली खान हिचा पती होणार असल्याचं म्हटलं जात आहे. सारा आणि विकीची जोडी जमली तरी कशी, हाच प्रश्न तुम्हालाही पडला ना? 


तर, खऱ्याखुऱ्या आयुष्यात नव्हे, तर चित्रपटामध्ये साराच्या पतीच्या रुपात अभिनेता विकी कौशल झळकणार आहे. केदारनाथ, कुली नंबर 1 आणि सिंम्बा यांसारख्या चित्रपटांमधून सारानं तिच्या अभिनयाची जादू प्रेक्षकांना दाखवली आहे. विकीनंही त्याच्या अभिनयाचं वेगळेपण सिद्ध केलं आहे. आता हे दोन्ही कलाकार चित्रपटाच्या निमित्तानं एकत्र झळकणार असल्यामुळं चाहत्यांसाठी ही एक परवणीच ठरणार आहे. 


लक्ष्मण उत्तेकर यांच्या रोमँटिक कॉमेडी प्रकारातील चित्रपटासाठी या दोघांची वर्णी लागली आहे. गेल्या बऱ्याच काळापासून यासाठीची तयारी सुरु असून, आता या जोडीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहण्याचीच उत्सुकता चाहत्यांमध्ये पाहायला मिळत आहे.