मुंबई : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal)आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांनी मोठ्या थाटामाटात लग्नगाठ बांधली. अतिशय मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला. पुढे मुंबईत आल्यावर या जोडीचा संसारही सुरु झाला. पण, आता म्हणे लग्नानंतर एका महिन्यातच या नात्याचं खरं चित्र समोर आलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सहसा तर विकी आणि कतरिना माध्यमांसमोर आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर सुरेख हास्य असतं. आनंद असतो. 


पण, आता मात्र परिस्थिती बदलली आहे असंच दिसतंय. विकीनं इन्स्टावर पोस्ट केलेले फोटो पाहून चाहत्यांनी हाच तर्क लावला. 


लग्नाला काहीच दिवस उलटलेले असताना आपल्या प्रिय व्यक्तीपासूनचा दुरावा काही विकीला सहन झालेला नाही, म्हणूनच की काय त्यानं थेट नर्मदा नदीचा किनाराच गाठला आहे. 


विकीच्या चेहऱ्यावर असणारे शून्य भाव, तो कतरिनाचीच आठवण काढत असल्याचं भासवत आहेत. 


आता या दोघांची केमिस्ट्रीच इतकी गोड, की चाहतेही या जोडीला एकमेकांपासून दूर पाहू इच्छित नाहीत. 



पण, हरकत नाही. कामानिमित्त दोघं एकमेकांपासून दूर असले तरीही मनानं मात्र विकी आणि कतरिना कायमच एकमेकांच्या जवळ आहेत हे मात्र नक्की. 


विकी आणि कतरिना कामाच्या कारणानं काही काळ एकमेकांपासून दूर असतात. पण, शक्य होईल तेव्हा आणि वेळ मिळे तेव्हा प्रत्येक वेळी ही जोडी एकमेकांच्या सोयीप्रमाणं एकत्र वेळ व्य़तीत करताना दिसते.