Vicky Kaushal Katrina Kaif : विकी कौशल आणि कतरिना कैफ या जोडीनं मागील वर्षी लग्नगाठ बांधली आणि त्या क्षणापासून ही जोडी चाहत्यांच्या मनात घर करून गेली. पाहता पाहता कतरिना आणि विकीच्याच नात्याच्या चर्चा सर्वत्र होऊ लागल्या. लग्नाआधीचं Relationship आणि त्यानंतर अतिशय खासगी स्वरुपात झालेल्या विवाहसोहळ्याची रंगत चाहत्यांनीही पाहिली आणि काहींनी तर या गोड जोडीची दृष्टही काढली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या या जोडीनं त्यांच्या करिअरसोबतच संसारालाही तितकंच प्राधान्य दिल्याचं पाहायला मिळत आहे. सध्याच्या घडीला विकी एकिकडे त्याच्या करिअरवर लक्ष देत असतानाच कतरिना बहुतांश वेळ घरातील कामांना देत आहे. अर्थात करिअरकडे तिचं दुर्लक्ष झालेलं नाही. 


Zara Hatke Zara Bachke या चित्रपटाच्या निमित्तानं सध्या विकी अनेक मुलाखती आणि कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसत आहे. या सर्व चर्चांमध्ये त्याच्या आणि कतरिनाच्या वैवाहिक नात्याविषयीसुद्धा बऱ्याच चर्चा होत आहेत. अशाच गप्पांच्या एका सत्रात त्यानं तिची एक सवय जगासमोर आणली. बरं, तिची ही सवय पाहून तुम्हालाही तिची कमालच वाटेल. कारण, तुमच्या आई- आजी, बहिणीप्रमाणं कतरिनासुद्धा घराच्या खर्चाबाबत चर्चा करते, घरातील नोकरचाकर मंडळींशीही या मुद्द्यावर चर्चा करते. 


पत्नीच्या या सवयीविषयी विकी म्हणाला... 


'सर्वात मजेशी भाग म्हणजे जेव्हा ती (कतरिना) घरात दर आठवड्याला किंवा एका आठवड्याआड एखादी सभा घेते. ती घरातील सर्व मतदनीस मंडळींना एकत्र बोलवते जिथं ती घरातला संपूर्ण हिशोब आणि त्याबाबतची चर्चा त्यांच्याशी करते. घरात पैसे कसे खर्च होत आहेत याचा हिशोब ती घेते आणि ही एक चांगली गोष्ट आहे', असं तो म्हणाला. कतरिनाचं हे सर्वकाही सुरु असताना विकीनं तो नेमका काय करत असतो हेसुद्धा सांगितलं. 


हेसुद्धा वाचा : Indian Railway च्या सुरक्षिततेसाठी गेल्या 5 वर्षांमध्ये किती खर्च? धक्कादायक वास्तव समोर 


आता तुम्हाला वाटेल की तो यामध्ये पत्नीची मदत करत असेल.... तर, तसं नाहीये. खुद्द विकीनंच याबाबतचा खुलासा करत सांगितलं, 'जेव्हाकेव्हा या चर्चा सुरु असतात तेव्हा मी मात्र त्या साऱ्याचा आनंद घेत असतो. मी त्या रसिकांसारखा आहे जे हातात पॉपकॉर्न घेऊन बसलेले असतात'. विकी जे करतो ते तुमच्यापैकी अनेक पुरुष मंडळी करत असतील. या अशा परिस्थितीचा तुम्ही कधी सामना केलाय का?