मुंबई : अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांनी काही महिन्यांपूर्वी लग्नगाठ बांधली. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत या जोडीनं त्यांच्या सहजीवनाला सुरुवात केली आणि पाहता पाहता ही जोडी सर्वांच्यात आवडीची झाली. (Vicky Kaushal Katrina kaif)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विकी आणि कतरिना आता जेव्हा जेव्हा समोर येतात तेव्हा तेव्हा त्यांच्यावर सर्वांच्याच नजरा खिळतात. आता तुम्ही म्हणाल असं का?


व्हायरल होणारे त्यांचे हे फोटो पाहा, तुम्हालाही या प्रश्नाचं उत्तर मिळेल. नुकतंच विकी कौशल त्याची पत्नी कतरिना कैफ हिच्यासोबत एका पार्टीसाठी पोहोचला होता.


अभिनेता फरहान अख्तर याच्या घरी ही पार्टी असल्याचं सांगण्यात आलं. फहानच्या घराखाली कलाकारांची ये-जा सुरु असतानाच तिथं विकी आणि कतरिनाची एंट्री झाली.


यावेळी ही जोडी एकमेकांचे हात पकडून आल्याचं पाहायला मिळालं. यावेळी विकीनं पांढरा शर्ट आणि डेनिम असा कॅज्युअल लूक केला होता. तर, कतरिनानं फ्लोरल प्रिंट असणारा रंगीबेरंगी छटा असणारा एक ऑफ शोल्डर मिनी ड्रेस घातला होता.



 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by vickat (@vickat81)


विकी आणि कतरिना पार्टीसाठी फरहानच्या घराजवळ पोहोचले आणि छायाचित्रकारांचा एकच कल्ला सुरु झाला. यावेळी या जोडीनंही मोठ्या प्रेमानं या मंडळींना अभिवादन करत ते पुढे गेले.


अंधाऱ्या रात्री पार्टी करण्यासाठी निघालेल्या विकी आणि कतरिनाचा हा अंदाज कितीही म्हटलं तरीही मनं जिंकणआरा होता हे मात्र खरं....