मुंबई : सेलिब्रिटींचा लग्नसोहळा म्हटला, की तिथे असणारी रंगच, भव्यपणा आणि तिथली प्रत्येक गोष्ट चाहत्यांच्या मनाचा ठाव घेते. कतरिना आणि विकी कौशलचंच उदाहरण घ्या ना. राजस्थानमध्ये जात या जोडीनं एका महालातच लग्नगाठ बांधली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अतिशय भव्य आणि तितक्याच डोळे दीपवणाऱ्या या सोहळ्यासाठी त्यांचे कुटुंबीय आणि खास मित्रपरिवार उपस्थित राहिला होता. 


हे झालं विकी आणि कॅटचं. पण, तुम्हाला माहितीये का नुकतंच एका सेलिब्रिटी जोडीने लग्न करत अगदी सुरेख आणि तितक्याच छोटेखानी कार्यक्रमात त्यांच्या नव्या आयुष्यातची सुरुवात केली. 


ही जोडी म्हणजे अभिनेता विक्रांत मेस्सी आणि अभिनेत्री शीतल ठाकूर. विक्रांत आणि शीतलने कोणत्याही ग्रँड सोहळ्याचं आयोजन न करता त्यांच्या घरातच लग्नगाठ बांधली. 


विवाह नोंदणी कायद्याअंतर्गत त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. वर्सोवा येथील त्यांच्या घरी यावेळी कुटुंबीयांचीच हजेरी होती. 




विक्रांत आणि शीतलने त्यांच्या या विवाहसोहळ्यातून सर्वांनाच छोटेखानी सोहळ्यासाठीची प्रेरणा दिली. 


शीतल आणि विक्रांतनं फार आधीच त्यांच्या नात्याची ग्वाही दिली होती. ज्यानंतर त्यांनी या नात्याला आता एका नव्या वळणावर नेण्याचा निर्णय़ घेतला. 


चाहत्यांपर्यंत ही बातमी पोहोचताच त्यांनीही या नवविवाहित दाम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली.