शेजारील व्यक्तीच्या गैरवर्तवणुकीमुळे अभिनेता संतापला; व्हिडिओ व्हायरल
अभिनेत्याला मारण्यासाठी देखील हा शेजारी पुढे आला होता.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता आणि स्टँडअप कॉमेडियन वीर दासने नुकताच त्याच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याच्या शेजारी राहणारा एक व्यक्ती त्याच्यासोबत गैरवर्तवणूक करताना दिसत आहे. शिवाय सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन न केल्यामुळे तो व्यक्ती तोंडावर लावलेले मास्क काढून खोकण्याचा प्रयत्न करत आहे. वीर दासने त्याच्या शेजाऱ्यांच्या व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.
त्याचप्रमाणे तो व्यक्ती वीर दासला मारण्यासाठी देखील पुढे आला होता. व्हिडिओ शेअर करत वीर दास ट्विटरच्या माध्यमातून सर्व घडलेला प्रकार सांगितला 'माझ घर तळमजल्यावर आहे. माझ्या घराबाहेर बसण्यासाठी जागा आहे. रात्री १० वाजता माझा एक शेजारी घरी आला, कारण आम्ही त्याचे जेवण बनवले होते. शिवाय १५ फूट लांब बसण्यासाठी मी त्याला खूर्ची देखील दिल्याचे वीरने सांगितले.
तो पुढे म्हणाला, त्याने सोबत कोल्ड्रिंगचे कॅन आणले होते आणि त्यांनी मास्क देखील लावले होते. त्यानंतर त्याने धुम्रपान करण्यासाठी मास्क काढले. शेजारी काही करणासाठी कॉम्प्लेक्समध्ये गेले. पाच मिनिटांनंतर ही घटना घडली. शिवाय तो व्यक्ती माझा घर मालक नाही असं देखील वीर दासने म्हटले आहे.
वीर दासच्या घर मालकाचं आणि त्या व्यक्तीचं वैर असल्यामुळे त्याना वीरसोबत गैरवर्तवणूक केल्याचं समोर येत आहे. तो ऍनेक्सा बिल्डिंगमध्ये पहिल्या मजल्यावर राहतो.