मुंबई : देशात आधीच बेरोजगारीचे सावट असताना. 'जेट एअरवेज' कंपनी बंद पडली आहे. त्यामुळे २० हजार कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. कंपनीवर ८ हजार कोटी रूपयांपेक्षा जास्त कर्ज आहे. कंपनी बंद झाल्यामुळे १६ हजार पे-रोल कर्मचारी आणि ६ हजार 6,000 कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी अचानक बेरोजगार झाले आहेत.  गुरूवारी जेट एअरवेजच्या विमानाने शेवटचे उड्डान भरले. बोइंग ७३७ विमानाने अमृतसरवरून उड्डान भरले आणि मुंबईच्या विमान तळावर कायमचे थांबले. व्यवस्थापनेच्या गचाळ कारभारामुळे कंपनी बंद झाल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. हजारो बेरोजगार कर्मचाऱ्यांनी जंतर-मंतर वर तिव्र आंदोलन केले. यावेळेस त्यांच्या डोळ्यात आश्रू आणि भविष्याची काळजी दिसत होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर 'जेट एअरवेज' कंपनीला टाळे लागल्यामुळे नेटकऱ्यांकडून प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. अव्वल दर्जेची सेवा देणाऱ्या कंपनीला टाळे लागल्यामुळे बॉलिवूडकरांचा देखील भ्रमनिरास झाला आहे. त्यांनी सुद्धा ट्विटरच्या माध्यमातून त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.