हेतर कुणीच केलं नसेल.... Love Letter सोबत आमिरला मिळाली धक्का देणारी गोष्ट
ना पत्नी, ना गर्लफ्रेंड.... आमिरवर इतकं प्रेम कोण करतंय?
मुंबई : परफेक्शनिस्ट अशी ओळख असणाऱ्या अभिनेता आमिर खान यानं बरीच दशकं बॉलिवूड गाजवलं. आजही आमिर नवख्या अभिनेत्यांना कमालीची टक्कर देताना दिसतो. आमिरचं रुपेरी पडद्यावरचं आयुष्य जितकं चर्चेत आलं तितकीच चर्चा त्याच्या खासगी आयुष्याबद्दलही झाली. (aamir khan )
सध्या आमिरच्या आयुष्यात जोडीदार म्हणून कोणी माणूस नाही. पहिल्या आणि दुसऱ्या पत्नीपासूनच्या नात्यावर आमिरनं घटस्फोटांचा पूर्णविराम दिला.
आता म्हणे आमिरवर एका अभिनेत्रीचा इतका जीव होता की तिनं त्याच्यासाठी सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या.
आमिरला तिनं प्रेमपत्रही लिहिली होती. हल्लीच या अभिनेत्रीनं तिच्या महाविद्यालयीन दिवसांबद्दलचा खुलासा करत ही गोष्ट सांगितली. या अभिनेत्रीनं 'रंगीला'मध्येही काम केलं होतं.
ही अभिनत्री आहे, शेफाली शाह. महाविद्यालयीन दिवसांमध्ये तिला कोणता अभिनेता आवडत होता असा प्रश्न विचारला गेला तेव्हा तिनं अभिनेता आमिर खान याचं नाव घेतलं.
आपल्याला आमिर खान आवडत असल्याचं सांगत ती म्हणाली, 'मी त्याला एक पत्र लिहिलं होतं. प्रेमपत्रासोबत एक फोटोही पाठवला होता. ज्यामध्ये मी दूर कुठेतरी इशारा करत उभी होती.
पण, तो छान फोटो होता. कारण तो काहीसा धुसर होता. मी त्याला एक लांबचलचक पत्र लिहिलं होतं.'
बरं आमिरला शेफालीच्या मनातील ही भावना आतापर्यंत ठाऊक नव्हती. पण, आतापर्यंत तिचं हे जाहीर वक्तव्य त्याच्यापर्यंत पोहोचलंच असेल. नाही का?