Aishwarya Rai Bachchan Doppelganger: अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हे नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. सध्या तिचा पोन्नियिन सेल्वन 1 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्यात तिचा लुक सगळीकडेच चर्चेचा विषय ठरला असून तिच्या या लुकवर चाहत्यांनी प्रेमाचा पाऊस पडला आहे. ऐश्वर्याच्या सौंदर्यावर सगळेच फिदा आहेतच पण तुम्हाला माहितीये का सध्या तिच्या पेक्षा तिची ओळख मिळालेल्या या मुलीचीच सर्वत्र चर्चा रंगली आहे. 


सध्या ऐश्वर्या रायसारखीच दिसणारी एक मुलगी सोशल मीडियावर धुमाकूळ घालते आहे, ती कोण आहे, कुठून आली आहे याचा काहीच थांगपत्ता नसताना तिचा असा एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होतो आहे.


असे म्हटले जाते की या संपूर्ण जगात एका व्यक्तीचे सात रूप असतात. यापुर्वीही अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींचे साम्य असलेले डॉपेलगँगर्स (डुपलिकेट्स) पाहिले आहेत. सौंदर्याचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणार्‍या या अभिनेत्रीसारखी दिसणारी एक मुलगी आहे जी सोशल मीडियावर सगळ्यांची मनं जिंकून घेते आहे.


अलीकडेच सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर आशिता सिंगने बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन सारख्याच लूकने इंटरनेटला वेड लावले आहे. अभिनेत्रीच्या चेहऱ्यावरील हावभाव यांची नक्कल करण्याचा ती प्रयत्न करते. ती तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर वारंवार व्हिडिओ पोस्ट करते आणि तिचे मोठ्या प्रमाणावर फॅन फॉलोइंग आहे. तिचे दोन लाखांहून अधिक सोशल मीडिया फॉलोअर्स आहेत.


आशिताने एक व्हिडिओ अपलोड केला आहे ज्यामध्ये ती मिमिक्री करताना दिसत आहे. व्हिडिओ व्हायरल होताच एका यूजरने लिहिले की, ‘ऐश्वर्या प्रो मॅक्स’. दुसर्‍या यूजरने लिहिले की, "ऐश सारखी दिसत आहे". एका तिसऱ्या वापरकर्त्याने "ऐश्वर्याची अनोखी प्रतिकृती" अशी टिप्पणी केली.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


या व्हायरल व्हिडिओला 5.5 लाखांहून अधिक दृश्ये आणि 16 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले.


ऐश्वर्या राय बच्चन मणिरत्नमच्या तमिळ पीरियड ड्रामा, पोन्नियिन सेल्वन 1 मध्ये नंदिनी आणि मंदाकिनी देवी या दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 30 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.